भविष्यात नागपूर देशातील अव्वल शहर होणार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:30 AM2019-02-13T00:30:35+5:302019-02-13T00:31:51+5:30

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील १०० शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले जाते. यात गेल्या सहा महिन्यापासून नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना गती मिळाल्याने नागपूरने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांचे अभिनंदन केले आहे. भविष्यात नागपूर देशातील अव्वल शहर होईल व हे स्थान टिकवून ठेवेल असा विश्वासदेखील व्यक्त केला.

Nagpur will be the first city in future: Nitin Gadkari | भविष्यात नागपूर देशातील अव्वल शहर होणार : नितीन गडकरी

भविष्यात नागपूर देशातील अव्वल शहर होणार : नितीन गडकरी

Next
ठळक मुद्दे ‘स्मार्ट सिटी’त पहिले स्थान टिकवून ठेवल्याबद्दल नागरिकांचे अभिनंदन

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील १०० शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले जाते. यात गेल्या सहा महिन्यापासून नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना गती मिळाल्याने नागपूरने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांचे अभिनंदन केले आहे. भविष्यात नागपूर देशातील अव्वल शहर होईल व हे स्थान टिकवून ठेवेल असा विश्वासदेखील व्यक्त केला.
‘ट्विटर ’वर गडकरींनी आपली भावना व्यक्त केली. प्रशासन तसेच विविध संघटना व लोकांमुळे ‘स्मार्ट सिटी’त नागपूरने प्रथम स्थान कायम ठेवले आहे. शहरात होत असलेला विकास भविष्यातील शहराच्या प्रगतिपथाची साक्ष देत असल्याचे गडकरी म्हणाले. ५२० कोटींच्या या प्रकल्पातील बहुसंख्य प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

Web Title: Nagpur will be the first city in future: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.