नागपूर विद्यापीठ :सांस्कृतिक पथकाच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 01:03 AM2019-01-03T01:03:38+5:302019-01-03T01:04:30+5:30

राज्य व विभाग पातळीवरील सांस्कृतिक स्पर्धांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. निवड झाल्यावरदेखील पथकात समावेश झालेला नाही, तसेच स्पर्धांत पाठविण्यात आलेले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर निवड प्रक्रियेत कुठलाही गोंधळ झाला नसल्याचा दावा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने केला आहे.

Nagpur University: Question marks on the selection of a cultural team | नागपूर विद्यापीठ :सांस्कृतिक पथकाच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह

नागपूर विद्यापीठ :सांस्कृतिक पथकाच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह

googlenewsNext
ठळक मुद्देनिवड झाल्यावरदेखील पथकात समावेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य व विभाग पातळीवरील सांस्कृतिक स्पर्धांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. निवड झाल्यावरदेखील पथकात समावेश झालेला नाही, तसेच स्पर्धांत पाठविण्यात आलेले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर निवड प्रक्रियेत कुठलाही गोंधळ झाला नसल्याचा दावा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने केला आहे.
राज्य व विभाग पातळीवरील स्पर्धांसाठी विद्यापीठाच्या सांस्कृतिक पथकाची निवड ऑक्टोबर महिन्यात झाली होती. दोन्ही स्पर्धांसाठी वेगवेगळ्या चमू बनविण्यात आल्या होत्या. एका विद्यार्थ्याने त्याची निवड राज्य व विभाग पातळीवर स्पर्धेसाठी झाली होती, असा दावा केला. राज्यस्तरीय स्पर्धा नाशिक येथे होणार होती. मात्र प्रत्यक्षात पथकाच्या समन्वयकांनी निवड प्रक्रियेत दुसऱ्या स्थानावर आलेल्या अन्य विद्यार्थ्याला राज्यस्तरीय स्पर्धेत पाठविणार असल्याची माहिती दिली. तर संबंधित विद्यार्थ्याला विभागीय पातळीवरील स्पर्धेत पाठविण्याची माहिती दिली. त्याला राज्य पातळीवर स्पर्धेत छायाचित्रकार म्हणून समाविष्ट करण्यात आले होते. नाशिकहून परतल्यानंतर ओडिशा येथील संभलपूर येथे होणाऱ्या विभाग पातळीवर स्पर्धेत जाण्याची तयारी करीत होता. मात्र प्रत्यक्ष स्पर्धेला जाणाऱ्या पथकात त्याचे नावच नसून, निवड प्रक्रियेत दुसऱ्या स्थानी असलेल्या विद्यार्थ्यालाच तेथे पाठविण्यात येत असल्याची माहिती त्याला मिळाली. यासंबंधात विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिलीप कावडकर यांना विचारणा केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. दरम्यान, या प्रकरणाबाबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया योग्यच असल्याचा दावा
विद्यार्थ्यांचे आरोप तथ्यहीन असल्याचा दावा डॉ. दिलीप कावडकर यांनी केला आहे. निवड प्रक्रिया योग्यच असून त्यात काहीही गडबड झालेली नाही. ज्यांची नावे यादीत आहेत, त्यांनाच चमूसोबत स्पर्धेला पाठविण्यात येत आहे. चमूमध्ये कुठलाही बदल करणे शक्य नाही. जर यादीत फेरबदल झाला होता तर विद्यार्थ्यांनी त्याची तक्रार का केली नाही. ज्या कर्मचाऱ्याला विद्यार्थी समन्वयक म्हणत आहेत, त्याची कधीच नियुक्ती करण्यात आली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Nagpur University: Question marks on the selection of a cultural team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.