नागपूर विद्यापीठ : अभ्यास मंडळांच्या निवडणुका २ जुलैपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 08:39 PM2018-06-13T20:39:06+5:302018-06-13T20:39:21+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या निवडणुकां​​​​​​​चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बुधवारपासून नामनिर्देशनपत्र नोंदणीला सुरुवात झाली असून, २ जुलैपासून निवडणुका होणार आहेत. ५५ अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची या माध्यमातून निवड होणार आहे. विशेष म्हणजे अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसोबतच विद्वत् परिषदेच्या स्थापनेची प्रक्रियादेखील पूर्ण होणार आहे.

Nagpur University: Election boards of study will be held from July 2 | नागपूर विद्यापीठ : अभ्यास मंडळांच्या निवडणुका २ जुलैपासून

नागपूर विद्यापीठ : अभ्यास मंडळांच्या निवडणुका २ जुलैपासून

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणूक कार्यक्रम जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बुधवारपासून नामनिर्देशनपत्र नोंदणीला सुरुवात झाली असून, २ जुलैपासून निवडणुका होणार आहेत. ५५ अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची या माध्यमातून निवड होणार आहे. विशेष म्हणजे अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसोबतच विद्वत् परिषदेच्या स्थापनेची प्रक्रियादेखील पूर्ण होणार आहे.
नागपूर विद्यापीठाने विविध विषयनिहाय निवडणूक वेळापत्रक घोषित केले आहे. नव्या कायद्यानुसार अभ्यास मंडळावर तीन सदस्यांची निवडणुकीने नियुक्ती झाली तर सहा सदस्य हे कुलगुरूंनी नामित केलेले आहेत. त्यातून एक अध्यक्ष निवडण्यात येणार आहे.
अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १३ ते २२ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत तर २३ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. २४ जून रोजी उमेदवारांची तात्पुरती यादी प्रकाशित होणार आहे. त्यावर अपील करण्याची २५ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली असून, २८ जूनपर्यंत त्यावर कुलगुरूंना अंतिम निर्णय घ्यायचा आहे तसेच २९ जून रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. ३० जूनपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत दिली आहे. परंतु प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय हे वेळापत्रक वेगळे आहे. प्रत्यक्ष निवडणुका या २ जुलैपासून सुरू होतील व ५ जुलैपर्यंत चालतील.
संघटना लागल्या कामाला
सद्यस्थितीत अभ्यास मंडळांवर नामनिर्देशित झालेल्या सदस्यांमध्ये शिक्षण मंचचे वर्चस्व आहे. अनेक मंडळांवर ‘सेक्युलर पॅनल’ तर काहींवर ‘यंग टीचर्स असोसिएशन’चे तीन-तीन सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. प्रत्येक संघटना यासाठी कामाला लागली आहे.

Web Title: Nagpur University: Election boards of study will be held from July 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.