नागपूर ग्रामीण वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्टिव्ह’,८७ लाखांचे तडजोडशुल्क वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:10 PM2018-06-12T23:10:16+5:302018-06-12T23:10:39+5:30

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील जिल्हा वाहतूक पोलिसांची वर्षभरातील कामगिरी ही दमदार राहिलेली आहे. अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सिट, विना हेल्मेट अशा केसेससह राँग साईड आणि मोटर वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात चालविलेली मोहीम आणि कारवाईचा आलेख पाहता ग्रामीण वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्टिव्ह’ असल्याचे स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे अपघाताच्या घटनांमध्येही घट झाली असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी झाली.

Nagpur Rural Traffic Police 'Active', recovered a compromise fee of 87 lakhs | नागपूर ग्रामीण वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्टिव्ह’,८७ लाखांचे तडजोडशुल्क वसूल

नागपूर ग्रामीण वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्टिव्ह’,८७ लाखांचे तडजोडशुल्क वसूल

googlenewsNext
ठळक मुद्दे२४६८ अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील जिल्हा वाहतूक पोलिसांची वर्षभरातील कामगिरी ही दमदार राहिलेली आहे. अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सिट, विना हेल्मेट अशा केसेससह राँग साईड आणि मोटर वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात चालविलेली मोहीम आणि कारवाईचा आलेख पाहता ग्रामीण वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्टिव्ह’ असल्याचे स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे अपघाताच्या घटनांमध्येही घट झाली असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी झाली.
वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते ३१ मे २०१७ २०१७ शी १ जानेवारी ते ३१ मे २०१८ सोबत तुलना करून ‘ग्राफ’ बनविला. त्यात अपघातामध्ये घट आणि कारवाईमध्ये अग्रेसर असल्याचे स्पष्टपणे दिसते. जिल्हा वाहतूक शाखेने जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस स्टेशन आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यावतीने वेळोवेळी कारवाई केली. त्यामुळेच हे यश वाहतूक शाखेला येऊ शकले. विना हेल्मेट मोटरसायकल चालविणे, ट्रिपल सिट मोटरसायकल चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, वाहनावर रिफ्लेक्टर नसणे, स्कूल बस चालकाने युनिफॉर्म न वापरणे, स्कूल बसमध्ये अटेंडंट नसणे, वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र नसणे, फिटनेस प्रमाणपत्र नसणे, बसस्थानकाजवळ २०० मीटरच्या आत वाहन पार्क करणे, धोकादायकरीत्या रस्त्याच्या कडेला वाहन उभे करणे, ओव्हरलोड वाहतूक करणे आदीसंबंधांने वाहतूक पोलिसांनी मोहीम राबविली.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपअधीक्षक (गृह) कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक आसिफ शेख, त्यांचे पथक, जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि कर्मचाऱ्यांनी मोहिमेला हातभार लावला.
अपघातप्रवण स्थळाची यादी, उपाययोजना
जिल्हा वाहतूक शाखेने नागपूर जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांची यादी तयार केली. त्यासंबंधाने तेथे उपाययोजना केली. तेथे फलक लावले. त्यामुळेच अपघाताचे प्रमाण कमी झाले. १ जानेवारी ते ३१ मे २०१७ या कालावधीत १५० अपघात होऊन १६१ जणांना जीव गमवावा लागला. तर या अपघातांमध्ये ५१९ जण जखमी झाले. तर १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या कालवधीत अपघातांची संख्या घटून ती १२७ पर्यंत आली. त्यामध्ये १३७ जणांचा मृत्यू तर ४२७ जण जखमी झाले. वाहतूक शाखेने केलेल्या उपाययोजनेमुळेच हे शक्य झाले. केवळ पाच महिन्यांचा हा आलेख आहे, हे विशेष!
कारवाईमध्ये वाढ
वाहतूक शाखेने १ जानेवारी ते ३१ मे १७ पेक्षा १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या कालावधीत कारवाईची संख्या वाढून तडजोड शुल्कही मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आले. १ जानेवारी २०१७ ते ३१ मे २०१७ या कालावधाीत अवैध प्रवासी वाहतुकीची २२२१ कारवाईसह राँग साईड वाहन चालविणे तसे इतर मोटर वाहन अशा एकूण २२ हजार ३१८ केसेस नोंदविल्या गेल्या. तर १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या पाच महिन्यांत २४६८ अवैध प्रवासी वाहतूक, २१३६ राँग साईड केसेस, इतर मोटर वाहन केसेस २० हजार ६१९ अशा एकूण २५ हजार २२३ कारवाई नोंदविल्या गेल्या. यामध्ये तब्बल २५१४ कारवाई मागील वर्षीपेक्षा अधिक आहे. एवढेच काय तर २०१७ च्या कालावधीत ८२ लाख ३ हजार ७०० रुपये आकारण्यात आलेल्या तडजोड शुल्कात २०१८ मध्ये वाढ झाली. १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या कालावधीत ८७ लाख ४१ हजार ९०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करून शासन दरबारी जमा करण्यात आले.

Web Title: Nagpur Rural Traffic Police 'Active', recovered a compromise fee of 87 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.