नागपूर आरटीओ : लायसन्सचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 09:45 PM2019-06-17T21:45:07+5:302019-06-17T21:45:48+5:30

नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) संगणकीय यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका पुन्हा एकदा नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला बसला. गेल्या १५ दिवसांपासून संबंधित प्रणाली संथ गतीने तर कधी अचानक बंद पडत असल्याच्या समस्या वाढल्याचे कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. सोमवारी दुपारी १ वाजता आरटीओमधील शिकाऊ वाहन परवान्यांचे (लर्निंग लायसन्स) कामकाज चालणारी प्रणाली अचानक बंद पडली. परिणामी, तिन्ही कार्यालयामधील सुमारे ३००वर उमेदवारांना ‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’ घेऊनही खाली हात परतावे लागले.

Nagpur RTO: The work of license is stuttering | नागपूर आरटीओ : लायसन्सचे काम ठप्प

नागपूर आरटीओ : लायसन्सचे काम ठप्प

Next
ठळक मुद्दे‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’ घेऊन आलेले रिकाम्या हाताने परतले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) संगणकीय यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका पुन्हा एकदा नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला बसला. गेल्या १५ दिवसांपासून संबंधित प्रणाली संथ गतीने तर कधी अचानक बंद पडत असल्याच्या समस्या वाढल्याचे कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. सोमवारी दुपारी १ वाजता आरटीओमधील शिकाऊ वाहन परवान्यांचे (लर्निंग लायसन्स) कामकाज चालणारी प्रणाली अचानक बंद पडली. परिणामी, तिन्ही कार्यालयामधील सुमारे ३००वर उमेदवारांना ‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’ घेऊनही खाली हात परतावे लागले.
राज्यांतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना ‘सारथी’ व ‘वाहन’ या संगणक प्रणालींद्वारे जोडण्यात आले आहे. या दोन्ही संगणक प्रणाली तयार करण्याचे काम हैदराबाद येथील ‘एनआयसी’ने केले आहे. तसेच या प्रणालींचे नियंत्रण व देखभाल, दुरुस्तीचे कामही ‘एनआयसी’ पाहते. परवाना संदर्भातील सर्व कामे ‘सारथी’ या संगणक प्रणालीद्वारे केली जातात. तर, वाहनांसंदर्भातील सर्व कामे ‘वाहन’ या संगणक प्रणालीद्वारे केली जातात. देशातील कोणत्याही नागरिकाला वाहनचालक परवाना काढण्यासाठी ‘सारथी’ या संगणक प्रणालीवरच ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तसेच सुरुवातीला शिकाऊ परवान्यासाठी अपॉईंटमेन्ट घ्यावी लागते. त्यानंतर अपॉईंटमेन्टच्या दिवशी संबंधित ‘आरटीओ’मध्ये जाऊन ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत असते. मात्र, सोमवारी दुपारी ‘सारथी’ या संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड आला. हा बिघाड लवकरच दूर होईल, असे संबंधित अधिकारी सांगत होते. परंतु सायंकाळचे ५ वाजूनही बिघाड दूर न झाल्याने तिन्ही कार्यालये मिळून साधारण ३००वर उमेदवारांना शिकाऊ परवान्यासाची परीक्षा न देताच खाली हात परतावे लागले. ही समस्या राज्यातील इतरही आरटीओ कार्यालयांना जाणवल्याचे समजते.

कधी सुरू होणार? उत्तर कुणाकडेच नाही
प्रणाली ठप्प पडल्याने आरटीओ अधिकाऱ्यांनी ‘एनआयसी’शी संपर्क साधला. संगणकीय यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. परंतु बिघाड कधी दुरुस्त होणार, याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. यामुळे दिवसभर ऑनलाईन परीक्षेच्या प्रतीक्षेत बसलेल्यांसामोर अपॉईंटमेन्ट कधीची घ्यावी, हा प्रश्न कायम होता.

बाहेर खासगीत प्रणाली सुरू, कार्यालयात ठप्प
आरटीओ कार्यालयाच्या बाहेर खासगीत ऑनलाईन सेंटर चालविणाऱ्यांकडे ही प्रणाली धडाक्यात सुरू होती. परंतु आरटीओ कार्यालयातच ही प्रणाली बंद होती. यामुळे नागरिकांमध्ये शंकेचेही वातावरण निर्माण झाले होते.

 

 

Web Title: Nagpur RTO: The work of license is stuttering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.