नागपूर रेल्वेस्थानकाने अनुभवला गडकरींचा साधेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:23 AM2019-06-06T00:23:21+5:302019-06-06T00:24:31+5:30

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. बुधवारी रात्री नागपूर रेल्वेस्थानकानेदेखील त्यांचे हे गुणवैशिष्ट्य अनुभवले. विमानाने जाणे सहज शक्य असतानादेखील एका सामान्य प्रवाशासारखे नितीन गडकरी कुटुंबासह यांनी नागपूर-मुंबई हा प्रवास दुरांतो एक्स्प्रेसने केला. कुठलाही गाजावाजा नाही, फारशी सुरक्षा व्यवस्था नाही, अशा वातावरणात गडकरी दुरांतोच्या एच १ कोचमधून पत्नी, दोन मुले, स्नुषा, नातवंड अशा १२ जणांसोबत मुंबईकडे रवाना झाले. विशेष म्हणजे कौटुंबिक दौरा असल्यामुळे कुटुंब वत्सलपणाचा भावही त्यांच्या चेहऱ्यावर जाणवला.

Nagpur Railway Station experiences simplicity of Gadkari | नागपूर रेल्वेस्थानकाने अनुभवला गडकरींचा साधेपणा

नागपूर रेल्वेस्थानकाने अनुभवला गडकरींचा साधेपणा

googlenewsNext
ठळक मुद्देदुरांतो एक्स्प्रेसने कुटुंबीयांसह मुंबईला रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. बुधवारी रात्री नागपूर रेल्वेस्थानकानेदेखील त्यांचे हे गुणवैशिष्ट्य अनुभवले. विमानाने जाणे सहज शक्य असतानादेखील एका सामान्य प्रवाशासारखे नितीन गडकरी कुटुंबासह यांनी नागपूर-मुंबई हा प्रवास दुरांतो एक्स्प्रेसने केला. कुठलाही गाजावाजा नाही, फारशी सुरक्षा व्यवस्था नाही, अशा वातावरणात गडकरी दुरांतोच्या एच १ कोचमधून पत्नी, दोन मुले, स्नुषा, नातवंड अशा १२ जणांसोबत मुंबईकडे रवाना झाले. विशेष म्हणजे कौटुंबिक दौरा असल्यामुळे कुटुंब वत्सलपणाचा भावही त्यांच्या चेहऱ्यावर जाणवला.
नागपूर रेल्वेस्थानकावर रात्री ८ वाजता रेल्वेच्या अधिकाऱ्यांची लगबग सुरू झाली. थोड्याच वेळात इतर प्रवाशांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुरांतोने प्रवास करीत असल्याचे समजले. गडकरी आपल्या कुटुंबासह दुरांतोत बसले. पत्नी कांचन गडकरी, मुलगा निखील, सारंग, दोन स्नुषा, नातवंड हे सर्वजण एच १ कोचमध्ये एच आणि सी या कुपेत बसले. उर्वरीत तीन जणांची व्यवस्था ए १ कोचमधील १३, १४ आणि १५ क्रमांकाच्या कोचमध्ये करण्यात आली होती. रेल्वेने प्रवासाचा निर्णय कसा घेतला, असा प्रश्न गडकरींना विचारला असता ते हसून म्हणाले, विमानाने नेहमीच प्रवास करतो. रेल्वेचा प्रवास हा आरामदायी असतो. मागील वर्षी रेल्वेने रत्नागिरीला गेलो होतो. वर्षभरानंतर रेल्वेत बसलो आहे. कुटुंबासह प्रवास करीत आहे, हा कुठलाही शासकीय दौरा नसल्याचे त्यांनी सांगितले. आठव्या क्रमांकाच्या होम प्लॅटफार्मची त्यांनी तोंडभरून प्रशंशा केली. मेट्रो रेल्वेचा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजनी रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी ८०० कोटी रुपये मिळाले असून अजनी देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वेस्थानक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुरांतोत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रवास करीत असल्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ, मुख्य तिकीट निरीक्षक प्रशांत चवरे हे स्वत: दुरांतो एक्स्प्रेसमध्ये हजर होते. गडकरी यांनी त्यांना कुठलीही ‘व्हीव्हीआयपी’ व्यवस्था करु नका. इतरांप्रमाणेच मीदेखील कुटुंबासह प्रवास करेन, असे सांगितले.

Web Title: Nagpur Railway Station experiences simplicity of Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.