स्मार्ट सिटीच्या कामात नागपूर नंबर १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 10:30 AM2018-06-21T10:30:36+5:302018-06-21T10:30:47+5:30

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील ९९ शहरांचे रँकिंग नगरविकास मंत्रालयाने केले आहे. यात आपल्या नागपूरने पहिला क्रमांक पटकाविला आहे.

Nagpur number 1 in the work of Smart City | स्मार्ट सिटीच्या कामात नागपूर नंबर १

स्मार्ट सिटीच्या कामात नागपूर नंबर १

Next
ठळक मुद्देदेशभरातील ९९ शहरांमध्ये अव्वल केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने केले रँकिंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर स्मार्ट होतेय. तेही झपाट्याने. याची पावती दिली आहे ती दस्तुरखुद्द केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील ९९ शहरांचे रँकिंग नगरविकास मंत्रालयाने केले आहे. यात आपल्या नागपूरने पहिला क्रमांक पटकाविला आहे.
९९ शहरांत स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या कामांच्या प्रगतीच्या आधारावर हे रँकिंग करण्यात आले आहे. उपराजधानीत पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा येथे स्मार्ट सिटी योजनेच्या एरिया बेस्ड डेव्हलपमेंट या घटकांतर्गत कामे सुरू आहेत़ या भागाचा क्षेत्राधिष्ठित विकास केला जाणार आहे. त्यासाठी नियोजनबद्ध विकासासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे़ त्यावर नागरिकांकडून आक्षेप आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या़ या कामातील गतिमानतेमुळे मनपाच्या वाट्याला हा बहुमान आला आहे़ शहरावर देखरेख ठेवण्यासाठी चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत़ एकूण ३,६६७ कॅमेरे कार्यान्वित आहेत़ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवरही यामुळे कारवाई करणे शक्य झाले आहे़ पॅन सिटी या घटकांतर्गत नागपूर स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ त्यात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घरोघरी जाऊन गोळा करण्यात येणारा ‘ओला’ आणि ‘सुका’ कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी नियोजन करण्यात आले़ याला फारशी गती मिळाली नसली तरी अन्य घटकांतर्गत उत्तम काम सुरू आहे़ त्यामुळे मनपाला ‘नंबर वन’ हा किताब केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने प्रदान केला आहे.

Web Title: Nagpur number 1 in the work of Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार