नागपूर विधान भवनासमोर मनपा कर्मचा-याचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 01:22 PM2018-07-18T13:22:10+5:302018-07-18T13:30:02+5:30

नागपूर विधान भवनासमोर नागपूर महानगरपालिकेतील एका कर्मचा-याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

Nagpur : municipal corporation employee's suicide attempt outside Nagpur Legislative Assembly | नागपूर विधान भवनासमोर मनपा कर्मचा-याचा आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर विधान भवनासमोर मनपा कर्मचा-याचा आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

नागपूर - नागपूर विधान भवनासमोर नागपूर महानगरपालिकेतील एका कर्मचा-याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र सतर्क पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.

प्रकाश बर्डे असे या मनपा कर्मचा-याचे नाव आहे. मनपाने 17 कर्मचा-यांना नोकरीतून काढले होते. या कर्मचा-यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयाने कर्मचा-यांच्या बाजूने निकाल देऊनही मनपाने त्यांना कामावर रुजू करून घेतले नाही. यामुळे कर्मचा-यांमध्ये असंतोष खदखदत होता. आपल्याला न्याय मिळावा या हेतूने प्रकाश बर्डे याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  

Web Title: Nagpur : municipal corporation employee's suicide attempt outside Nagpur Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.