१५ रुपयात बसा नागपूरच्या मेट्रोत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:45 PM2019-01-31T23:45:55+5:302019-01-31T23:54:10+5:30

नागपूरकरांना मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महामेट्रोची व्यावसायिक सेवा फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. खापरी ते सीताबर्डी १३ कि़मी. आणि लोकमान्यनगर ते सुभाषनगर सहा कि़मी. असे दोन टप्पे राहणार आहे. पण प्रवाशांना मेट्रोत बसण्यासाठी दोन कि़मी.करिता १५ रुपये मोजावे लागणार आहे.

Nagpur Metro of 15 rupees! | १५ रुपयात बसा नागपूरच्या मेट्रोत!

१५ रुपयात बसा नागपूरच्या मेट्रोत!

Next
ठळक मुद्दे मेट्रो रेल्वेने प्रवास : शासनाच्या जीआरनुसार भाडे निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकरांनामेट्रो रेल्वेने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महामेट्रोची व्यावसायिक सेवा फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. खापरी ते सीताबर्डी १३ कि़मी. आणि लोकमान्यनगर ते सुभाषनगर सहा कि़मी. असे दोन टप्पे राहणार आहे. पण प्रवाशांना मेट्रोत बसण्यासाठी दोन कि़मी.करिता १५ रुपये मोजावे लागणार आहे.
राज्य शासनाच्या २०१४ च्या जीआरनुसार महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात मेट्रोचे प्रवासी भाडे निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या दोन कि़मी.करिता १५ रुपये निर्धारित करण्यात आल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
नागपुरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्येच्या अनुषंगाने निर्माण झालेली वाहतूक समस्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमातून सुटणार आहे. शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पेट्रोलच्या किमतीपेक्षा अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करणे शक्य आहे. याशिवाय मानसिक त्रासाची झंझट राहणार नाही. आॅटोमोटिव्ह चौक ते खापरी (मिहान) आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्गावर जवळपास ३९ कि़मी. अंतरावर मेट्रो धावणार आहे. दीक्षित यांनी नागपूर मेट्रो रेल्वेत प्रवास करण्यासाठी कि़मी.नुसार किती भाडे लागेल, याची माहिती दिली. त्यानुसार दोन कि़मी.पर्यंत १५ रुपये, चार कि़मी.पर्यंत १९ रुपये, सहा कि़मी.पर्यंत २३ रुपये, नऊ कि़मी.पर्यंत २८ रुपये, १२ कि़मी.पर्यंत ३० रुपये, १५ कि़मी.पर्यंत ३४ रुपये, १८ कि़मी.पर्यंत ३६ रुपये, २१ कि़मी.पर्यंत ३९ आणि २१ पेक्षा जास्त कि़मी.करिता ४१ रुपये भाडे लागणार आहे. हे भाडे दुचाकी वा चारचाकीने प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या किमतीपेक्षा अर्धे असल्याचा दावा दीक्षित यांनी केला आहे.

Web Title: Nagpur Metro of 15 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.