नागपूर विधीमंडळ अधिवेशन; सर्पमित्र होणार सर्वत्र तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:08 AM2018-06-25T10:08:40+5:302018-06-25T10:10:13+5:30

नागपुरातील विधिमंडळ अधिवेशन म्हटले की, संपूर्ण सरकार आणि प्रशासन हे नागपुरात दाखल होत असते. त्यासाठी त्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्थाही केली जाते. परंतु यंदा या सुरक्षा व्यवस्थेसोबतच अधिवेशनादरम्यान सर्पमित्रांचीही करडी नजर राहणार आहे.

Nagpur Legislative Assembly; Serpamitra deployed everywhere | नागपूर विधीमंडळ अधिवेशन; सर्पमित्र होणार सर्वत्र तैनात

नागपूर विधीमंडळ अधिवेशन; सर्पमित्र होणार सर्वत्र तैनात

Next
ठळक मुद्देराजभवन, रविभवन, आमदार निवास आदी ठिकाणांवर नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील विधिमंडळ अधिवेशन म्हटले की, संपूर्ण सरकार आणि प्रशासन हे नागपुरात दाखल होत असते. त्यासाठी त्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्थाही केली जाते. परंतु यंदा या सुरक्षा व्यवस्थेसोबतच अधिवेशनादरम्यान सर्पमित्रांचीही करडी नजर राहणार आहे. कारण पावसाचे दिवस लक्षात घेता प्रशासनाने सर्पमित्रही तैनात केले आहेत.
विधानभवन, राजभवन, नागभवन हा परिसर तसा हिरवळीचा असून वर्षभर फारशी वर्दळ नसते. हिवाळी अधिवेशनातच या ठिकाणी वर्दळ वाढत असते. या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे आहेत. त्यामुळे येथे सापांचे वास्तव्य असते. हिवाळी अधिवेशनादरम्यान तयारी करीत असताना साप निघत असतात. अशा वेळी सर्पमित्रांना बोलावले जाते. परंतु यंदा पावसाळी अधिवेशन नागपुरात होऊ घातले आहे. पावसाच्या या मोसमात साप निघण्याच्या घटना या नैसर्गिक आहेत. तसेच राजभवन व विधानभवनाचा परिसर लक्षात घेता, या ठिकाणी पावसाच्या मोसमात साप मोठ्या प्रमाणात निघू शकतात. अशा वेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये, लोकप्रतिनिधींची धावपळ होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने सर्पमित्र तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या किती सर्पमित्र तैनात करावे, याबाबत निर्णय झाला नसला तरी विधानभवन, राजभवन आणि आमदार निवास या ठिकाणी अधिवेशन काळात सर्पमित्र तैनात राहतील, अशी शक्यता आहे.

Web Title: Nagpur Legislative Assembly; Serpamitra deployed everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.