नागपूरचे कुटुंब न्यायालय झाले सुपरफास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:26 AM2018-05-21T10:26:58+5:302018-05-21T10:27:06+5:30

शहरातील कुटुंब न्यायालय दरवर्षी ९० टक्क्यांवर प्रकरणे निकाली काढत आहे. न्यायव्यवस्थेचे एकूण चित्र लक्षात घेतल्यास ही कामगिरी सुपरफास्ट प्रकारात मोडते.

Nagpur family court is now became super fast | नागपूरचे कुटुंब न्यायालय झाले सुपरफास्ट

नागपूरचे कुटुंब न्यायालय झाले सुपरफास्ट

Next
ठळक मुद्देदरवर्षी ९० टक्क्यांवर प्रकरणांमध्ये निर्णयपाच वर्षांत १७ हजारावर निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कुटुंब न्यायालय दरवर्षी ९० टक्क्यांवर प्रकरणे निकाली काढत आहे. न्यायव्यवस्थेचे एकूण चित्र लक्षात घेतल्यास ही कामगिरी सुपरफास्ट प्रकारात मोडते. या न्यायालयात गेल्या पाच वर्षांत एका बाजूने १८ हजार ८७९ प्रकरणे दाखल झालीत तर, दुसऱ्या बाजूने न्यायालयाने १७ हजार २८ प्रकरणांवर निकाल दिला.
उपलब्ध आकडेवारीनुसार, न्यायालयात वर्ष २०१३ मध्ये ३६८२ (दिवाणी-२४३४, फौजदारी-१२४८), २०१४ मध्ये ३८८१ (दिवाणी-२६२५, फौजदारी-१२५६), २०१५ मध्ये ३६५५ (दिवाणी-२५०४, फौजदारी-११५१), २०१६ मध्ये ३७९८ (दिवाणी-२६२२, फौजदारी-११७६) तर, २०१७ मध्ये ३८६३ (दिवाणी-२७२५, फौजदारी-११३८) प्रकरणे दाखल झाली होती. दुसºया बाजूने न्यायालयाने २०१३ मध्ये ३३५० (दिवाणी-२३३३, फौजदारी-१०१७), २०१४ मध्ये ३५३४ (दिवाणी-२४४६, फौजदारी-१०८८), २०१५ मध्ये २९५२ (दिवाणी-२०८५, फौजदारी-८६७), २०१६ मध्ये ३४२७ (दिवाणी-२३६६, फौजदारी-१०६१) तर, २०१७ मध्ये ३७६५ (दिवाणी-२६५१, फौजदारी-१११४) प्रकरणे निकाली काढली.

२०१८ मधील कामगिरी
२०१८ च्या सुरुवातीला न्यायालयात ६१२६ प्रकरणे प्रलंबित होती. त्यानंतर मार्चपर्यंत न्यायालयात ७११ दिवाणी व ३४१ फौजदारी अशी एकूण १०५२ प्रकरणे दाखल झाली तर, न्यायालयाने ७६३ दिवाणी व ३२६ फौजदारी अशी एकूण १०८९ प्रकरणे निकाली काढली.


 

Web Title: Nagpur family court is now became super fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.