नागपूर जि.प. आरोग्य विभागाच्या १०२ क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्सचे वाहनचालक जाणार संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 09:19 PM2017-12-13T21:19:11+5:302017-12-13T21:19:30+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात १०२ क्रमांकावर आपत्कालीन सेवा देणारे वाहनचालक सोमवार १८ डिसेंबरपासून संपावर जाणार आहे.

Nagpur District The Health Department's 102-number Ambulance vehicle will be staged | नागपूर जि.प. आरोग्य विभागाच्या १०२ क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्सचे वाहनचालक जाणार संपावर

नागपूर जि.प. आरोग्य विभागाच्या १०२ क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्सचे वाहनचालक जाणार संपावर

Next
ठळक मुद्देतीन महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा

आॅनलाईन लोकमत
नागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात १०२ क्रमांकावर आपत्कालीन सेवा देणारे वाहनचालक सोमवार १८ डिसेंबरपासून संपावर जाणार आहे. जि.प.च्या ४२ प्राथमिक आरोग्य केंद्रात ४२ वाहनचालक कार्यरत आहे. यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने, त्यांनी संप पुकारला आहे.
ग्रामीण भागात आरोग्याची सेवा देणारे हे वाहन चालक कंत्राटी कामगार आहे. जिल्हा परिषदेने नागपूर ग्रामीण युवक बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, तुमसर यांना वाहन चालक पुरविण्याचे कंत्राट दिले आहे. ग्रामीण भागातील ४२ प्राथमिक आरोग्य केंद्रात हे वाहनचालक २४ तास रुग्णसेवा पुरवित आहे. कंत्राटदाराने या वाहनचालकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे वाहनचालकांनी वेतनासाठी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर वाहनचालकांचा आरोप आहे की, कंत्राटदार संस्थेकडून वाहनचालकांची अडवणूक करण्यात येते. कंत्राटदार संस्थेला प्रति वाहनचालक १५ हजार रुपये मिळतात. त्यातून वाहनचालकांना केवळ ७५०० रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून, नवीन कंत्राटी पद्धतीनेच पण जिल्हा परिषदेमार्फत वाहनचालकांना नियुक्ती द्यावी, अशी मागणी या वाहनचालकांनी केली आहे.

Web Title: Nagpur District The Health Department's 102-number Ambulance vehicle will be staged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य