स्वतंत्र विदर्भासाठी बुधवारी नागपूर शहर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:57 PM2018-07-03T23:57:56+5:302018-07-03T23:59:08+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी तसेच महाराष्ट्र शासनाचे नागपूरला होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी विदर्भविरोधी आमदार व मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ४ जुलै रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपूर शहर बंद करण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. नागपुरात हरताळ पाळून नागपूरकरांनी, व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही समितीकडून करण्यात आले आहे.

Nagpur city Band for independent Vidarbha on Wednesday | स्वतंत्र विदर्भासाठी बुधवारी नागपूर शहर बंद

स्वतंत्र विदर्भासाठी बुधवारी नागपूर शहर बंद

Next
ठळक मुद्देविदर्भ विरोधकांनो परत जा : विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी तसेच महाराष्ट्र शासनाचे नागपूरला होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी विदर्भविरोधी आमदार व मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ४ जुलै रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपूर शहर बंद करण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. नागपुरात हरताळ पाळून नागपूरकरांनी, व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही समितीकडून करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता शहराच्या चारही बाजूंनी पदयात्रा काढण्यात येईल. ही पदयात्रा गांधीपुतळा, विदर्भ चंडिका, इतवारी, तुकडोजी पुतळा, मानेवाडा रोड, लालबहादूर शस्त्री चौक गोकुलपेठ येथून निघेल. तसेच चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा येथून सर्व विदर्भवादी कार्यकर्ते व्हेरायटी चौक येथे एकत्र येतील.
या आंदोलनाला विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा, बीआरएसपी, जनसुराज्य पार्टी, विदर्भ कनेक्ट, विदर्भ संघर्ष समिती, नाग विदर्भ आंदोलन समिती, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, आम आदमी पार्टी, आदिम पार्टी, आरपीआय खोब्रागडे, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स आदी ४० संघटनांचे समर्थन असल्याचा दावा समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केला आहे.

बॉक्स..
आठवलेंचा रिपाइं बंदमध्ये नाही
अधिवेशनाचे औचित्य साधून स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुकारण्यात आलेल्या शहर बंद आंदोलनात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ)सहभागी होणार नाही, असे पक्षाचे शहराध्यक्ष बाळू घरडे यांनी कळविले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध आहे. भाजपाने या मागणीकडे दुर्लक्ष करू नये. यासाठी पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल. स्वतंत्र विदर्भासाठी लढणाºया संघटनेसोबत रिपाइं (आ) आहे. परंतु अधिवेशनाचे औचित्य साधून पुकारण्यात आलेल्या बंदला आमचे समर्थन नाही, असे रिपाइं (आ)च्या बैठकीत ठरविण्यात आले. बाळू घरडे यांच्या अध्यक्षतेखली आयोजित बैठकीत भीमराव मेश्राम, धर्मपाल गजभिये, रहुल मेश्राम, बाबुलाल गाडे, प्रशांत टेंभेकर, संदेश खोब्रागडे, संदेश भागवतकर आदी उपस्थित होते.

Web Title: Nagpur city Band for independent Vidarbha on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.