नागपुरात इमारत बांधकाम परवानगी आता पोर्टलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:59 PM2018-07-21T23:59:04+5:302018-07-22T00:00:33+5:30

राज्य सरकारने नगर परिषद, महानगरपालिका व संबंधित नियोजन प्राधिकरणे यांच्याकडील इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विविध परवानगी प्रकरणात एकसूत्रता आणण्यासाठी अद्ययावत ‘बिल्डींग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम’ (बीपीएमएस) पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल येत्या २५ जुलैपासून नागपूर महापालिकेतर्फे सुरू करण्यात येईल.

Nagpur building construction permit is now on the portal | नागपुरात इमारत बांधकाम परवानगी आता पोर्टलवर

नागपुरात इमारत बांधकाम परवानगी आता पोर्टलवर

Next
ठळक मुद्दे२५ जुलैपासून सुरुवात : बीपीएमएसचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने नगर परिषद, महानगरपालिका व संबंधित नियोजन प्राधिकरणे यांच्याकडील इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विविध परवानगी प्रकरणात एकसूत्रता आणण्यासाठी अद्ययावत ‘बिल्डींग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम’ (बीपीएमएस) पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल येत्या २५ जुलैपासून नागपूर महापालिकेतर्फे सुरू करण्यात येईल.
शनिवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात महापौर नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत बीपीएमएस पोर्टलच्या विस्तृत माहितीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, प्रमुख उपअभियंता श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील वास्तुतंत्र, वास्तुशिल्पी, सिव्हील इंजिनियर, सुपरवायजर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या बीपीएमएस पोर्टलमुळे इमारत बांधकाम परवानगीचे कार्य अधिक सुलभ होणार आहे. शहरातील वास्तुतंत्र, वास्तुशिल्पी, सिव्हील इंजिनियर, सुपरवायजर यांना अगोदर बीपीएमएस पोर्टल अथवा राज्यशासनाच्या ‘महावास्तू’ या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत. त्याची पडताळणीही आॅनलाईन पद्धतीनेच मनपातील लिपिकाकडून त्यावर शेरा देतील. यानंतर इमारत बांधकाम परवानगी संदर्भातील पुढील प्रक्रिया करता येणार आहे.

फाईलच्या मनस्तापापासून सुटका
या संपूर्ण प्रक्रियेमुळे सर्वांचेच काम सुलभ होणार असून वेळेची बचत होणार आहे. विशेष म्हणजे परवानगीसाठी अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या फाईलच्या मनस्तापासून सुटका मिळणार आहे.
 

 

Web Title: Nagpur building construction permit is now on the portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.