नागपुरात सायको किलरचा पुन्हा हैदोस : दोन महिलांवर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 08:06 PM2018-12-07T20:06:11+5:302018-12-07T20:11:37+5:30

दोन वर्षांपूर्वी नागपुरातील महिलांवर चाकू हल्ला करून प्रचंड दहशत निर्माण करणारा आणि पोलीस सक्रिय झाल्यामुळे रहस्यमयरीत्या गायब झालेला सायको किलर आज भल्या सकाळी पुन्हा सक्रिय झाला. त्याने पाच मिनिटात मालू राऊत आणि सविता मानेकर नामक दोन महिलांवर चाकूहल्ला करून त्यांना जबर जखमी केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ६ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने उपराजधानीत पुन्हा एकदा थरार निर्माण झाला आहे. दरम्यान, यापूर्वी महिलांवर हल्ला करण्याची पद्धत आणि वेळ तसेच पद्धत बघता हा जुनाच सायको किलर असावा, असा संशय आहे.

In Nagpur again Psycho killer raged : Two women attacked by knife | नागपुरात सायको किलरचा पुन्हा हैदोस : दोन महिलांवर चाकू हल्ला

नागपुरात सायको किलरचा पुन्हा हैदोस : दोन महिलांवर चाकू हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्दे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन वर्षांपूर्वी नागपुरातील महिलांवर चाकू हल्ला करून प्रचंड दहशत निर्माण करणारा आणि पोलीस सक्रिय झाल्यामुळे रहस्यमयरीत्या गायब झालेला सायको किलर आज भल्या सकाळी पुन्हा सक्रिय झाला. त्याने पाच मिनिटात मालू राऊत आणि सविता मानेकर नामक दोन महिलांवर चाकूहल्ला करून त्यांना जबर जखमी केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ६ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने उपराजधानीत पुन्हा एकदा थरार निर्माण झाला आहे. 


शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास अयोध्यानगर जवळच्या शारदा चौक परिसरात एक महिला साफसफाई करीत होती. तर दुसरी मॉर्निंग वॉक करीत होती. अचानक दुचाकीवर आलेल्या सायको किलरने एकीच्या खांद्याजवळ तर ३०० मीटर अंतरावरील दुसरीच्या पाठीवर चाकू मारून शिवीगाळ करीत पळ काढला. अचानक झालेल्या चाकू हल्ल्यामुळे दोन्ही महिला प्रचंड घाबरल्या. त्या आरडाओरड करू लागल्या. यावेळी परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची मोठी गर्दी होती. 

सीसीटीव्ही फुटेज निकामी
या भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात समोरच्या कॅमेºयात सायको किलरच्या दुचाकीच्या हेडलाईटचा तीव्र प्रकाशझोत कॅमेऱ्यावर येत असल्यामुळे स्पष्ट असे काहीच दिसत नाही. त्यामुळे मागच्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज पोलीस तपासत आहेत.

 

Web Title: In Nagpur again Psycho killer raged : Two women attacked by knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.