नागपुरात पुन्हा एक रशियन वारांगना सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:18 AM2018-09-25T01:18:47+5:302018-09-25T01:21:21+5:30

सीताबर्डीतील गंगा काशी हॉटेलमध्ये रशियन महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुख्यात सचिन सोनारकरला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) सोमवारी रात्री ७ च्या सुमारास अटक केली. त्याच्या ताब्यात असलेल्या एका उझबेकिस्तानच्या वारांगनेला पोलिसांनी ताब्यात घेतले. लोकमतने रविवारच्या अंकात एसएसबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करताच एसएसबीने ही कारवाई केली.

Nagpur again found a Russian sex worker | नागपुरात पुन्हा एक रशियन वारांगना सापडली

नागपुरात पुन्हा एक रशियन वारांगना सापडली

googlenewsNext
ठळक मुद्देकुख्यात सचिन सोनारकरला अटक : एसएसबीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीताबर्डीतील गंगा काशी हॉटेलमध्ये रशियन महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुख्यात सचिन सोनारकरला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) सोमवारी रात्री ७ च्या सुमारास अटक केली. त्याच्या ताब्यात असलेल्या एका उझबेकिस्तानच्या वारांगनेला पोलिसांनी ताब्यात घेतले. लोकमतने रविवारच्या अंकात एसएसबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करताच एसएसबीने ही कारवाई केली.
वेश्याव्यवसायात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेला सचिन सोनारकर आॅनलाईन वेश्याव्यवसाय चालवतो. विशिष्ट ग्राहकांना तो सेवा देतो आणि त्यांच्यासाठी कुठलीही वारांगना उपलब्ध करून देतो. सचिनला यापूर्वीही अनेकदा पोलिसांनी अटक केली आहे. तरीदेखील तो या व्यवसायात सक्रिय आहे. त्याच्याकडे ठिकठिकाणचे आंबटशौकिन आणि वारांगना यांची भलीमोठी यादी आहे. त्याचे शहरातील अनेक हॉटेल, लॉज व्यवस्थापक आणि फार्महाऊसच्या चौकीदारांसोबत संबंध आहे. तसेच त्याने अनेक भागात भाड्याच्या सदनिका घेऊन ठेवल्या आहेत. ग्राहकाच्या मागणीनुसार तो वारांगना त्यांच्याकडे पोहचवतो. शहरात अनेक ठिकाणी हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे वारंवार होणाºया कारवायांमुळे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षा पथक टीकेचे धनी बनले आहे. लोकमतने रविवारच्या अंकात एसएसबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करताच एसएसबीचे पथक सक्रिय झाले. त्यांनी कारवाईसाठी धावपळ सुरू केली. या पार्श्वभूमीवर, सोमवारी दुपारी कुख्यात सचिन सोनारकरसोबत बनावट ग्राहकाच्या माध्यमातून संपर्क केला. सोमवारी रात्री त्याने रशियन बाला उपलब्ध असल्याचे सांगून ग्राहकाला सीताबर्डीतील इटर्निटी मॉलसमोर बोलवले. तेथे आठ हजारांची मागणी करून सहा हजारात सौदा पक्का केल्यानंतर ग्राहकाला सीताबर्डीतील हॉटेल गंगा काशी येथे एक विशिष्ट चिट देऊन पाठवले. पोलिसांचा माणूस असलेला ग्राहक हॉटेलच्या रूममध्ये २९ वर्षीय वारांगनेकडे पोहचला. ठरल्याप्रमाणे काही वेळेनंतर पोलीस निरीक्षक विक्रमसिंग गौड आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. त्यांनी ग्राहकासोबत नको त्या अवस्थेत वारांगनेला ताब्यात घेतले. तत्पूर्वी, सचिन सोनारकरच्याही पोलिसांनी मुसक्या बांधल्या.

तीन दिवसांपासून देहविक्रय
रशियन तरुणी म्हणून ग्राहकांकडून हजारो रुपये घेणाऱ्या सचिनने या तरुणीला तीन दिवसांपासून गंगा काशी हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले होते. त्याने तिच्याकडून या दिवसात वेश्याव्यवसाय करवून घेतल्याचा अंदाज आहे. ती उझबेकिस्तानची रहिवासी असून, सचिनने पैशाचे आमिष दाखवून आपल्याला बोलवून घेतल्याचे तिने पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे, रात्री ७ ते ८ वाजतापासून पोलिसांनी सुरू केलेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.

 

Web Title: Nagpur again found a Russian sex worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.