नागपुरात ‘आप’ने काढली धक्का मार रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:32 PM2018-05-24T23:32:22+5:302018-05-24T23:32:35+5:30

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात गुरुवारी आम आदमी पार्टीने आवाज उठविला. मॉरिस कॉलेज टी पॉईंट ते संविधान चौकापर्यंत दुचाकी ढकलत नेत ‘धक्का मार’ आंदोलन करून दरवाढीचा निषेध करण्यात आला. दरवाढीसाठी सरकार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महागाईची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली.

In Nagpur, AAP rushed to push the rally | नागपुरात ‘आप’ने काढली धक्का मार रॅली

नागपुरात ‘आप’ने काढली धक्का मार रॅली

Next
ठळक मुद्देपेट्रोल डीझेल दरवाढीचा निषेध : महागाईची अंत्ययात्राही काढली

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात गुरुवारी आम आदमी पार्टीने आवाज उठविला. मॉरिस कॉलेज टी पॉईंट ते संविधान चौकापर्यंत दुचाकी ढकलत नेत ‘धक्का मार’ आंदोलन करून दरवाढीचा निषेध करण्यात आला. दरवाढीसाठी सरकार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महागाईची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली.
आपचे संयोजक डॉ. देवेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात झालेल्या यया आंदोलनात अंबरीश सावरकर, जगजीत सिंग, कविता सिंगल, अशोक मिश्र, डॉ. संजय जीवतोडे, राजेश तिवारी, कमलाकर कानफाडे, शंकर इंगोले, आर. एस. रेणू, बी.एम. जिचकार, मायकल, महेंद्र मिश्रा, हेमंत बनसोड, शशिकांत रायपुरे, अविराज थूल, प्रमोद नाईक, संजय शर्मा, उमाकांत बनसोड, धीरज अढाऊ, दीपक कट्यारमल, देवेंद्र परिहार, चमन बमानेले, संतोष वैद्य, राजेश पौनीकर, संजय सिंग, रविकांत वाघ, राहुल जोशी, सुरेंद्र बरगदे, दुर्गेश खरे, दुर्गेश दुवे, शालिनी अरोरा, रजनी शुक्ला, आशा बोकडे, बालाजी आबादार, किरण वेल्लोर, सत्विनदार सिंग, रामकुमार गुप्ता, राजेश गील्लोर, कैलाश कावला, भंतेजी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.
देशातील पेट्रोल डीझेलचे दर जगात सर्वात जास्त असल्याचे दिसून येत आहे. सरकार कडून गेल्या १२ दिवसात १२ वेळा पेट्रोल डीझेल ची दरवाढ करण्यात आली. गेल्या महिन्यात कर्नाटकाच्या निवडणुका होईपर्यंत १९ दिवसात एकदाही भाव वाढ का करण्यात आली नाही, असा सवाल यावेळी देवेंद्र वानखेडे यांनी केला. सरकारने दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.

Web Title: In Nagpur, AAP rushed to push the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.