ठळक मुद्देमुस्लीम राष्ट्रीय मंचचे आयोजन : हिंदू-मुस्लीम बंधुभाव वाढविणारे रक्षासूत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून कार्य करणाºया मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे नागपुरात एक अभिनव प्रयोग राबविण्यात आला. हिंदू-मुस्लीम बंधुभाव वाढीस लागावा यासाठी मंचातर्फे शनिवारी अनोख्या पद्धतीने ‘रक्षाबंधन’ साजरे करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाºयांना मुस्लीम महिलांनी राखी बांधली.
हंसापुरी येथील एका हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार, महानगर संघचालक राजेश लोया, सहकार्यवाह रवींद्र बोकारे, मुस्लीम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संयोजक विराग पाचपोर, महाराष्ट्र संयोजक मोहम्मद फारुक, डॉ.संजय बालपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर मुस्लीम नागरिकांची उपस्थित होती. यावेळी इंद्रेशकुमार यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या देशातील सणांच्या माध्यमातून सामाजिक संदेश गेला पाहिजे.
रक्षाबंधनाला देश, पंथ, धर्माचे बंधन नाही. लोकांना एकत्र आणणारा व जिव्हाळ्याच्या सूत्रात बांधणारा तसेच विषमता नष्ट करणारा हा सण आहे. विशेष म्हणजे महिलांचा सन्मान करणारा हा सण आहे. प्राचीन परंपरा असलेले हे रक्षाबंधन धर्माच्या चौकटीत ठेवणे योग्य नाही. अशा प्रकारच्या आयोजनांमुळे समाजात एकता वाढीस लागेल, असे मत यावेळी इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले. यावेळी मुस्लीम महिलांनी इंद्रेशकुमार तसेच इतर उपस्थितांना राखी बांधली. नागपुरात अशा प्रकारच्या आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे.
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.