नागपुरात जन्मदात्रीला मारणाऱ्या भावाची हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:50 AM2018-06-23T00:50:06+5:302018-06-23T00:50:54+5:30

जन्मदात्या आईला नेहमी मारहाण करणाऱ्या दारुड्या भावाची त्याच्या मोठ्या भावाने हत्या केली. जागनाथ बुधवारी परिसरातील सावजी गल्लीत शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.

The murder of a brother who beat mother in Nagpur | नागपुरात जन्मदात्रीला मारणाऱ्या भावाची हत्या 

नागपुरात जन्मदात्रीला मारणाऱ्या भावाची हत्या 

googlenewsNext
ठळक मुद्देदारुड्याच्या त्रासापासून सुटका : आधार देणारा कारागृहात : वृद्धेची अवस्था वाईट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जन्मदात्या आईला नेहमी मारहाण करणाऱ्या दारुड्या भावाची त्याच्या मोठ्या भावाने हत्या केली. जागनाथ बुधवारी परिसरातील सावजी गल्लीत शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.
राजू रामभाऊ आमदे (वय ४२) असे आरोपीचे तर संजय रामभाऊ आमदे (वय ४१) असे मृताचे नाव आहे. रामभाऊ आमदे पोलीस दलात उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाले. ते सावजी गल्लीत राहायचे. त्यांचा लहान मुलगा संजय याला दारूचे भारी व्यसन होते. तो दारूच्या नशेत घरी येऊन पत्नी आणि आईला बेदम मारहाण करायचा. या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली. तेव्हापासून संजय दारू पिऊन घरी आला की अश्लील शिवीगाळ करून आईला बेदम मारहाण करीत होता. त्याला वारंवार समजावून ही तो सुधारत नसल्याने घरच्यांसोबतच शेजारची मंडळीही त्याचा राग करायची. गुरुवारी रात्री तो अशाच प्रकारे दारूच्या नशेत टून्न होऊन आईला मारहाण करू लागला. मध्यरात्रीनंतरही त्याची मारहाण आणि शिवीगाळ सुरुच होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मोठा भाऊ राजूने त्याला कपडे धुण्याच्या मोगरीने बदडले. परिणामी त्याचा मृत्यू झाला. पहाटे २ च्या सुमारास हा प्रकार उघड झाला. त्यानंतर पश्चात्तापाने पोळलेला राजू थेट तहसील ठाण्यात पोहचला. त्याने ती मोगरी पोलिसांच्या हवाली करून संजयच्या हत्येची माहिती दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. मारहाण करणाऱ्या संजयपासून कायमची सुटका मिळाली असली तरी वृद्धावस्थेतील आधार असलेला राजू कारागृहात पोहचल्याने वृद्ध आईची अवस्था वाईट झाली आहे.
 

Web Title: The murder of a brother who beat mother in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.