शुक्रवारी तलावात चिमुकलीसह उडी घेऊन मातेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:30 AM2019-06-25T00:30:32+5:302019-06-25T00:31:32+5:30

दोन वर्षांच्या चिमुकलीसह शुक्रवारी  (गांधीसागर ) तलावात उडी घेऊन एका मातेने आत्महत्या केली. आज सोमवारी सकाळी मायलेकीचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृत महिलेची अद्याप ओळख पटली नाही. मात्र ती वर्धा येथील रहिवासी असावी, असा अंदाज बांधून गणेशपेठ पोलिसांचे पथक तिची ओळख पटविण्यासाठी वर्धेला रवाना झाले होते.

Mother suicides with daughter by jumping in Shukrawari lake | शुक्रवारी तलावात चिमुकलीसह उडी घेऊन मातेची आत्महत्या

शुक्रवारी तलावात चिमुकलीसह उडी घेऊन मातेची आत्महत्या

Next
ठळक मुद्देमृतांची ओळख पटली नाही : मायलेकी वर्धेच्या असल्याचा अंदाज : गणेशपेठ पोलिसांची चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन वर्षांच्या चिमुकलीसह शुक्रवारी  (गांधीसागर ) तलावात उडी घेऊन एका मातेने आत्महत्या केली. आज सोमवारी सकाळी मायलेकीचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृत महिलेची अद्याप ओळख पटली नाही. मात्र ती वर्धा येथील रहिवासी असावी, असा अंदाज बांधून गणेशपेठ पोलिसांचे पथक तिची ओळख पटविण्यासाठी वर्धेला रवाना झाले होते.
गणेशपेठ पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास समाजसेवक जगदीश खरे यांना महिला व चिमुकलीचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. त्यांनी लगेच गणेशपेठ पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलीस पोहचल्यानंतर खरे यांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. मृत महिलेकडे ओळखपत्र किंवा ओळख पटविणारा दुसरा कसलाच पुरावा आढळला नाही. तलावाच्या काठावर तिच्या चपला आढळून आल्या. महिलेचा फोटो काढून परिसरात, शहरात तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिसांना पाठविण्यात आले. त्या फोटोशी मिळतेजुळते वर्णन असलेली महिला तिच्या कुटुंबीयांसोबत वर्धेतून नागपुरात आली होती, अशी माहिती पोलिसांना कळली. दुपारी गणपती घाटाजवळ पोलिसांना एक थैली सापडली. या थैलीत वर्धा ते नागपूर असे रेल्वे तिकीट होते. थैलीत चिमुकलीसाठी घेतलेला बिस्किटचा पुडा आणि २५ रुपयेही आढळले. त्यामुळे वर्धा पोलिसांशी संपर्क साधून महिलेबाबत माहिती दिली. त्यानंतर दुपारी पोलीस पथक वर्धा येथे रवाना झाले. वृत्त लिहिस्तोवर महिलेची ओळख पटलेली नव्हती.

Web Title: Mother suicides with daughter by jumping in Shukrawari lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.