पाच जणांना ठार मारणाऱ्या  क्रूरकर्मा मुलाच्या धास्तीने आईचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:47 PM2018-06-29T23:47:38+5:302018-06-29T23:49:12+5:30

नंदनवनमधील पवनकर हत्याकांडातील क्रूरकर्मा आरोपीच्या आईने शुक्रवारी (दि. २९) नैराश्य आणि भीतीमुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तिला वाचविले. हा धक्कादायक प्रकार अरोली (ता. मौदा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरगाव येथे घडला.

The mother attempted suicide due to dread of the cruel son who killed five people | पाच जणांना ठार मारणाऱ्या  क्रूरकर्मा मुलाच्या धास्तीने आईचा आत्महत्येचा प्रयत्न

पाच जणांना ठार मारणाऱ्या  क्रूरकर्मा मुलाच्या धास्तीने आईचा आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देनागपूर नजीक नवरगाव येथील  विहिरीत घेतली उडी : ग्रामस्थांनी वाचविले

लोकमत न्यूज नेटवर्क
 नागपूर : नंदनवनमधील पवनकर हत्याकांडातील क्रूरकर्मा आरोपीच्या आईने शुक्रवारी (दि. २९) नैराश्य आणि भीतीमुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तिला वाचविले. हा धक्कादायक प्रकार अरोली (ता. मौदा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरगाव येथे घडला.
संध्या गुलाब पालटकर (६०, रा. नवरगाव, ता. मौदा) असे नैराश्य आलेल्या क्रूरकर्मा विवेक पालटकरच्या आईचे नाव आहे. १० जूनच्या रात्री क्रूरकर्मा विवेक पालटकर हा नंदनवन येथे राहात असलेल्या जावई कमलाकर पवनकरच्या घरात शिरला. तेथे त्याने बहीण अर्चना, जावई कमलाकर, मीराबाई तसेच वेदांती आणि कृष्णाचा निर्घृण खून केला. ११ जून रोजी सकाळच्या सुमारास हा थरारक प्रकार लक्षात येताच सर्वत्र खळबळ उडाली. या घटनेनंतर आरोपी विवेक हा पंजाबमध्ये पळाला होता. घटनेनंतर तब्बल १० दिवसांनी २१ जून रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने लुधियाना शहरातून त्याला अटक करीत नागपुरात आणले. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली.
यापूर्वी आरोपीने त्याच्या पत्नीचाही खून केला. क्रूरकर्मा विवेक हा आपल्यालाही संपवू शकतो, असा विचार त्याची आई संध्या यांच्या मनात घोळत होता. त्यांचे पती गुलाबराव यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून दोन्ही मुली या विवाहित असून बाहेरगावी असतात. त्यामुळे घरात एकट्याच राहत असल्याने घरी येऊन मुलगा आपला जीव घेणार तर नाही ना, असे सतत विचारचक्र त्यांच्या डोक्यात सुरू होते. याबाबत त्यांनी ग्रामस्थांनाही सांगितले होते. दरम्यान शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्यांनी गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी धाव घेत त्यांना विहिरीतून बाहेर काढले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Web Title: The mother attempted suicide due to dread of the cruel son who killed five people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.