जगातील सर्वात कठीण मॅराथॉन सहारा वाळवंट अतुलला करायचा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 08:13 PM2017-11-25T20:13:00+5:302017-11-25T20:18:52+5:30

दक्षिण आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात दरवर्षी जगातील सर्वात कठीण मॅराथॉन आयोजित केली जाते. एप्रिल २०१८ मध्ये ही ३३ वी मॅराथॉन होत आहे. यात अजूनपर्यंत एकाही भारतीयाने सहभाग नोंदविला नाही. वाळवंटातील २५० किलोमीटरची ही मॅराथॉन पार करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती नागपुरातील अतुलकुमार चौकसे याने बाळगली आहे.

The most difficult marathon in the world Sahara Desert has to cross by Atul | जगातील सर्वात कठीण मॅराथॉन सहारा वाळवंट अतुलला करायचा पार

जगातील सर्वात कठीण मॅराथॉन सहारा वाळवंट अतुलला करायचा पार

Next
ठळक मुद्दे३२ वर्षांत एकही भारतीय धावला नाहीआतापर्यंत तिघांचा मृत्यू ,नऊ बेपत्ता

आॅनलाईन लोकमत
नागपूर : दक्षिण आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात दरवर्षी जगातील सर्वात कठीण मॅराथॉन आयोजित केली जाते. एप्रिल २०१८ मध्ये ही ३३ वी मॅराथॉन होत आहे. यात अजूनपर्यंत एकाही भारतीयाने सहभाग नोंदविला नाही. वाळवंटातील २५० किलोमीटरची ही मॅराथॉन पार करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती नागपुरातील अतुलकुमार चौकसे याने बाळगली आहे. या मॅराथॉनमध्ये भारताचा तिरंगा झळकविण्याचा त्याचा मानस आहे.
अतुलकुमार चौकसे एक साहसी युवक आहे. मोहननगरमध्ये तो राहतो. १० ते १२ वर्षांपासून तो रनिंग करतो आहे. तो देशभरात होणाऱ्या २५ ते ३० मॅराथॉनमध्ये सहभागीसुद्धा झाला आहे. जीवनात काही तरी थ्रील करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे देशात होणाऱ्या  अवघड मॅराथॉनमध्येसुद्धा तो सहभागी झाला आहे. अतुलने लडाखमध्ये होणाऱ्या  खरडुंगा चॅलेंज या ७२ किलोमीटरच्या मॅराथॉनमध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे. ही मॅराथॉन समुद्रसपाटीपासुन १८,५०० किलोमीटरवर असते. देशातील सर्वात अवघड मॅराथॉन म्हणून नोंद आहे. येथे प्राणवायूचे प्रमाण कमी असते. त्यामुळे स्पर्धा पूर्ण करणे अनेकांना शक्य होत नाही. त्याचबरोबर लडाख येथील ४२ किलोमीटरची मॅराथॉन, बंगलोर येथे झालेली ७५ किलोमीटरची अल्ट्रा मॅराथॉनमध्ये तो धावला आहे. त्यात तिसरा रँक त्याने मिळविला आहे. त्याचबरोबर नागपूर-छिंदवाडा, नागपूर-अमरावती अशा १०६, १०४ किलोमीटर अंतर त्याने धावून पार केले आहे.
अतुलचे हे साहसी अनुभव लक्षात घेता, त्याने जगातील सर्वात कठीण असलेली सहारा वाळवंटातील एमडीएस मॅराथॉन पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. ही मॅराथॉन अतिशय थरारक असून, त्यासाठी त्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

का अवघड आहे ही मॅराथॉन
या मॅराथॉनला ‘मॅराथॉन डिसेबल’असे म्हंटल्या जाते. ही मॅराथॉन दक्षिण आफ्रिकेच्या मोरोक्को येथे होणार आहे. यात २५० किलोमीटर सहाराच्या वाळवंटात धावायचे आहे. धावताना २० किलो वजन घेऊन धावायचे आहे. या २० किलोमध्ये टेंट, खाण्याचे साहित्य, चाकू, स्लीपिंग बॅग राहणार आहे. कधी ३८ ते ५० डिग्री तर कधी ७ ते १३ डिग्री तापमानामध्ये तो धावणार आहे. रनिंग करताना वादळाचा सामना करावा लागणार आहे. येथे धावताना जीवाचा धोका आहे. वन्यप्राण्यांची जोखीम आहे. यात जखमी झाल्यास स्वत:लाच उपचार करायचे आहेत. या मॅराथॉनमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. नऊ लोक बेपत्ता झाले आहेत. भारताकडून अजूनपर्यंत यात कुणीच सहभाग घेतला नाही.

अतुलपुढे अडचण
अतुलने मॅराथॉन पूर्ण करण्याचा संकल्प केला असला तरी, त्याच्यापुढे आर्थिक अडचणी आहेत. या मॅराथॉनमध्ये नोंदणी करण्यासाठी अडीच लाख रुपये लागतात. त्याचबरोबर जाण्या-येण्याचा खर्च असे सर्व मिळून १५ लाखाचा खर्च येणार आहे. अतुलचे एक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. त्याने सरकारकडे आवाहन केले आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनासुद्धा पत्र पाठविले आहे. अतुलने आपल्या फेसबुकवरूनसुद्धा आवाहन केले आहे. या जीवघेण्या मॅराथॉनमध्ये धावून देशाचा तिरंगा झळकविण्याचा त्याचा मानस पूर्ण करण्यासाठी समाजातूनसुद्धा त्याला मदतीची अपेक्षा आहे. त्याच्या मदतीसाठी या ८४४६३९९९८८ मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

 

 

 

Web Title: The most difficult marathon in the world Sahara Desert has to cross by Atul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.