नागपुरात सिमेंट रस्ते असलेल्या भागातच जास्त खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:02 AM2019-04-19T10:02:21+5:302019-04-19T10:03:42+5:30

नागपुरात लक्ष्मीनगर व धरमपेठ भागात मोठ्याप्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहेत. असे असतानाही लक्ष्मीनगर झोनच्या क्षेत्रात सर्वाधिक खड्डे असल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे.

More potholes in the cement roads in Nagpur | नागपुरात सिमेंट रस्ते असलेल्या भागातच जास्त खड्डे

नागपुरात सिमेंट रस्ते असलेल्या भागातच जास्त खड्डे

Next
ठळक मुद्देहॉटमिक्स विभागाचा अजब दावा खड्डे बुजवलेल्या भागात अधिक खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेने शहरातील खड्ड्यांची समस्या कायमची मार्गी लावण्यासाठी शहरात सिमेंट रस्त्यांची कामे हाती घेतलेली आहेत. लक्ष्मीनगर व धरमपेठ भागात मोठ्याप्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहेत. असे असतानाही लक्ष्मीनगर झोनच्या क्षेत्रात सर्वाधिक खड्डे असल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे. तसेच हॉटमिक्स विभागाने सर्वाधिक खड्डे बुजवलेल्या याच भागात अधिक खड्डे आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पावसाळा सुरू झाला की डांबरी रस्ते उखडून रस्त्यावर खड्डे पडतात. खड्ड्यामुळे अपघात होतात. वाहन चालकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे काम केल्यानंतर दोन वर्षांचा दायित्व कालावधी असतो. त्यानुसार गेल्या चार वर्षात महापालिकेने जवळपास ५०० रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. शहरातील रस्ते महापालिका, नासुप्र,सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आदींच्या मालकीचे आहेत. परंतु २२७१ किलोमीटरपैकी २१७२ किलोमीटर लांबीचे रस्ते महापालिकेच्या मालकीचे असल्याने शहरातील रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी प्रामुख्याने महापालिकेचीच आहे. गेल्या ११ महिन्यात हॉटमिक्स विभागाने शहरात १० हजार ८३८ खड्डे शोधून काढले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणचे खड्डे काही महिन्यांपूर्वी बुजविण्यात आले होते, त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे निर्माण झालेले आहेत. खड्डे बुजवण्यावर दरवर्षी १० ते १२ कोटींचा खर्च करूनही पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे निर्माण होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
नागपूर शहरातील सर्वच भागात खड्ड्यांची समस्या निर्माण होते. याचा विचार करता शहरात तीन टप्प्यात सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील पहिल्या टप्प्यातील रस्ते जवळपास पूर्ण झालेले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील रस्ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. तिसºया टप्प्यातील रस्त्यांनाही सुरुवात झाली आहे. यात लक्ष्मीनगर व धरमपेठ झोन इतर झोनच्या तुलनेत आघाडीवर आहेत. या भागातील डांबरी रस्त्यांवरील खड्डेही अधिक बजुवण्यात आले आहे,असे असूनही या झोनमध्ये खड्ड्यांची संख्या अधिक आहे.
१ एप्रिल २०१८ ते २१ फेब्रुवारी २०१९ पर्यंत महापालिकेने १० हजार ८३८ खड्डे शोधून काढले आहेत. झोननिहाय आकडेवारीनुसार लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक १,७८७ खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या झोनमधील प्रभाग ३६, ३७ व ३८ मधील खड्डे अजूनही कायम असल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापौरांकडे केलेल्या आहेत. त्यामुळे या आकडेवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: More potholes in the cement roads in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.