विदर्भात २० जूननंतर धडकणार मान्सून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:57 AM2019-05-20T09:57:02+5:302019-05-20T10:00:04+5:30

हवामान विभागाने केरळमध्ये ६ जून रोजी मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविला आहे. अशा परिस्थितीत १० ते १२ दिवसानंतरच विदर्भात मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे.

Monsoon will hit Vidarbha after June 20 | विदर्भात २० जूननंतर धडकणार मान्सून

विदर्भात २० जूननंतर धडकणार मान्सून

Next
ठळक मुद्देदीड आठवडा विलंबाची शक्यतापिण्याच्या पाण्याचे संकट ओढवणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केरळमध्ये विलंबाने पोहोचणाऱ्या मान्सूनच्या ढगांनी विदर्भवासीयांची चिंता वाढविली आहे. साधारणपणे १० जूनपर्यंत नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात मान्सून धडकतो. परंतु हवामान विभागाने केरळमध्ये ६ जून रोजी मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविला आहे. अशा परिस्थितीत १० ते १२ दिवसानंतरच विदर्भात मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या ढगांच्या गतीमध्ये काही अडचण न आल्यास २० जूनपर्यंत मान्सूनचे ढग विदर्भात धडकतील अन्यथा आणखी विलंब होऊ शकतो.
एकीकडे मान्सून उशिरा येणार असल्याच्या वृत्तादरम्यान नागपुरात पिण्याच्या पाण्याचे संकटही ओढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मान्सून २० जूनलाही पोहोचला तरी रिकामी असलेली धरणे भरायला वेळ लागतो. नागपुरात पाणी पुरवठ्यासाठी १० जूनपर्यंतच पाणी शिल्लक आहे. मृतसाठ्यातील पाणी वापरण्याची मंजुरी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. परंतु तेथूनही केवळ ३० जूनपर्यंतच पाणी घेता येईल.

Web Title: Monsoon will hit Vidarbha after June 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.