नागपुरात मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी ‘मो-बाईक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:21 PM2017-12-11T22:21:23+5:302017-12-11T22:23:58+5:30

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत होणाऱ्या विकासासोबतच मेट्रो प्रवाशांसाठी मो-बाईकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या स्थानकांवर ये-जा करण्यासाठी मो-बाईक सोईची ठरणार असून पर्यावरणपूरक राहील.

'Mo-Bike' for passengers at Nagpur Metro station | नागपुरात मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी ‘मो-बाईक’

नागपुरात मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी ‘मो-बाईक’

Next
ठळक मुद्देपर्यावरणाला पूरक : अ‍ॅप मोबाईलवर डाऊनलोडची सुविधा

ऑनलाईन लोकमत 
नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत होणाऱ्या विकासासोबतच मेट्रो प्रवाशांसाठी मो-बाईकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या स्थानकांवर ये-जा करण्यासाठी मो-बाईक सोईची ठरणार असून पर्यावरणपूरक राहील.
महामेट्रोतर्फे घेण्यात आलेला हा निर्णय नागपूरकरांना नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. अ‍ॅन्ड्रॉईड फोनवरून हा अ‍ॅप ग्राहकांना सहज डाऊनलोड करता येणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने चालणाऱ्या या अ‍ॅपमुळे मेट्रो प्रवाशांना दुसऱ्या वाहनांप्रमाणेच मो-बाईकची सुविधा महामेट्रोतर्फे देण्यात येणार आहे. मो-बाईकचा गरजेपुरता वापर केल्यानंतर जवळच्या सार्वजनिक स्थानकांवर लॉक करून पार्क करता येईल. यासाठी थोडासा वेळ ग्राहकांना लागणार आहे.
मो-बाईकने ये-जा करणे सोपे असून त्यामुळे वाहतूक सेवा व्यवस्थित होईल. मो-बाईक तुमच्या लगतच्या मेट्रो स्थानकांवर सहज उपलब्ध होणार आहे. अल्पदरात मो-बाईकचा वापर केल्यानंतर वापरकर्त्याच्या अ‍ॅप अकाऊंटमधून पैसे आपोआप कटतील. मो-बाईक जीपीएस सिस्टमने कनेक्ट असेल. थ्रीजी आणि फोरजी नेटवर्कवर हा अ‍ॅप वापरता येणार आहे. शेअरिंग पद्धतीने उपयोग होणाºया मो-बाईकचे लोकेशन ग्राहकांना अ‍ॅपवर मिळणार आहे.
मो-बाईक ही चीन येथून आयात करण्यात येणार असून, चीनमधील अधिकांश नागारिक ये-जा करण्याकरिता याचा उपयोग करतात. १८० शहरंमध्ये उपयोग केल्या जात असून, दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.

Web Title: 'Mo-Bike' for passengers at Nagpur Metro station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.