लग्नाचे आमिष दाखवून नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:39 PM2017-11-17T14:39:58+5:302017-11-17T14:43:16+5:30

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत दोन वर्षांत अनेकदा शरीरसंबंध जोडणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Minor girl raped in Nagpur by her lover | लग्नाचे आमिष दाखवून नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपी एमबीएचा विद्यार्थीदोन वर्षांपासून शोषण

आॅनलाईन लोकमत
नागपूर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत दोन वर्षांत अनेकदा शरीरसंबंध जोडणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पवन अरु ण कडू (वय २०) असे आरोपीचे नाव आहे.
पवन कळमन्यातील भवानीनगरात गणेश मंदीरजवळ राहतो. तो एमबीएच्या प्रथम वर्षाला शिकतो आहे. खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका मुलीसोबत (वय १७) त्याचे दोन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शरीरसंबंध जोडू लागला. दोन वर्षांनंतर आता मात्र तो तिला टाळू लागला. त्याचे दुसरीकडे सूत जुळल्याच्या संशयामुळे पिडितेचा त्याच्यासोबत वाद होऊ लागला. अखेर तिने त्याला लग्नासाठी विचाले असता त्याने नकार दिला. त्यामुळे पिडितेने गुरु वारी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून पवन कडूला अटक केली आहे.

Web Title: Minor girl raped in Nagpur by her lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.