मेट्रोच्या अपघातात वाहनचालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:10 AM2018-08-01T01:10:07+5:302018-08-01T01:10:50+5:30

नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ज्या वेगात सुरू आहे, त्याच गतीने मेट्रोचे अपघातही वाढले आहेत. याच शृंखलेत सोमवारी रात्री वर्धा रोडवर डबल डेकर पुलावरून स्टीलचा मोठा बार (सळाख) एका युवकावर पडल्यामुळे जखमी झाला, तर दुसरा युवक बचावला.

In the metro accident vehicle rider injured | मेट्रोच्या अपघातात वाहनचालक जखमी

मेट्रोच्या अपघातात वाहनचालक जखमी

Next
ठळक मुद्दे डबल डेकर पुलावरून युवकावर पडला स्टील बार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ज्या वेगात सुरू आहे, त्याच गतीने मेट्रोचेअपघातही वाढले आहेत. याच शृंखलेत सोमवारी रात्री वर्धा रोडवर डबल डेकर पुलावरून स्टीलचा मोठा बार (सळाख) एका युवकावर पडल्यामुळे जखमी झाला, तर दुसरा युवक बचावला.
जखमी युवकाचे नाव प्रशांत शहाणे (३५) असून तो सीतारामनगर येथील रहिवासी आहे, तर दुसऱ्या बचावलेल्या युवकाचे नाव डॉ. राजेंद्र ठाकूर आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रशांत शहाणे सोमवार रात्री ११ च्या सुमारास दुचाकी वाहनाने (एमएच-३१, ईटी ९३२४) छत्रपती चौकातून घरी जात होते. वर्धा रोडवर इंडसइंड बँकसमोरून जाताना अचानक मेट्रोच्या डबल डेकर पुलावरून स्टीलचा मोठा बार प्रशांतच्या छातीला लागून गाडीच्या समोर पडला. त्यामुळे त्याचे संतुलन बिघडले आणि ते वाहनासह रस्त्यावर पडले. जखमी अवस्थेत प्रशांतने मोबाईलवरून मित्र आणि नातेवाईकाला घटनेची माहिती दिली. काही वेळात मित्र घटनास्थळी आले. यादरम्यान ते बºयाचवेळ घटनास्थळी होते. ये-जा करणारे वाहनचालक थांबून घटनेची माहिती जाणून घेत होते. या मार्गावर तब्बल एक तास वाहतूक थांबली होती. पण मेट्रोचा कुणीही अधिकारी जखमी प्रशांत शहाणे आणि डॉ. राजेंद्र ठाकूरची स्थिती जाणून घेण्यासाठी आला नाही. बºयाच वेळानंतर मेट्रो क्यूआरटीची माणसे आल्यानंतर त्यांना लोकांचा रोष सहन करावा लागला. अखेर या घटनेची माहिती प्रतापनगर पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलीस आल्यानंतर लोकांचा रोष कमी झाला. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

प्रकरणाची चौकशी सुरू
महामेट्रोच्या बांधकामादरम्यान सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात येत असल्यामुळे अशा घटना होत नाहीत. परंतु, वर्धा रोडवर सोमवारी झालेली घटना दुर्भाग्यपूर्ण आहे. महामेट्रो प्रशासन या घटनेची चौकशी करीत आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर आवश्यक कारवाई करण्यात येईल.
 अखिलेश हलवे, डीजीएम (सीसी), महामेट्रो.

Web Title: In the metro accident vehicle rider injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.