मनोरुग्णालयाचाच ‘मेंटल ब्लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:23 AM2017-07-24T02:23:49+5:302017-07-24T02:23:49+5:30

मानसिक आजाराने ग्रासलेल्या रुग्णावर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे

'Mental block' of psychiatry | मनोरुग्णालयाचाच ‘मेंटल ब्लॉक’

मनोरुग्णालयाचाच ‘मेंटल ब्लॉक’

Next

प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वास्तव : रुग्णांना मारहाण, जुगाराचा खेळ, गळा दाबून हत्या व आता अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानसिक आजाराने ग्रासलेल्या रुग्णावर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी नागपुरात प्रादेशिक मनोरुग्णालयाला सुरुवात झाली. परंतु प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या ‘मेंटल ब्लॉक’मुळे रुग्णच सुरक्षित नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मनोरुग्णांच्या दुर्दैवाचे दशावतार दूर करणे बाजूला पडले असून अयोग्य वागणूक, मारहाण, हत्या व आता अत्याचाराचीही घटना समोर आल्याने वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, याच भावनेतून रुग्णालयाचे कामकाज सुरू असल्याची शंका बोलून दाखविली जात आहे.
दररोजच्या ताणतणावांमुळे मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र प्रादेशिक रुग्णालयात त्यांच्यावरच्या उपचारांची गुणवत्ता, येथील सोईसुविधा वाढविण्याची आवश्यकता कुणालाच वाटत नसल्याचे वास्तव आहे. ‘लोकमत’ने येथील डॉक्टर, अटेंडंटची अल्प असलेल्या संख्येपासून ते रुग्णांना थंडीच्या दिवसात गरम पाणी व लोकरीचे कपडे मिळत नसल्याचे, रुग्णांना मारहाण होत असल्याचे, त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेतली जात असल्याचे, रुग्णालयाच्या आत कर्मचारी जुगार खेळत असल्याचे, रुग्णाच्या उपचाराकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे, रुग्णालयाच्या अव्यवस्थेसोबतच दोन रुग्णाची गळा दाबून हत्या झाल्याचे प्रकरण बाहेर काढले. यातील बहुसंख्य प्रकरणे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चेलाही आली. परंतु त्यानंतरही रुग्णालयाचा विकास व येथील कारभार ढीम्मच आहे.

Web Title: 'Mental block' of psychiatry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.