एमसीआयच्या पथकाकडून मेडिकलची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:35 PM2018-09-17T22:35:34+5:302018-09-17T22:35:53+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एमबीबीएसच्या २०० जागांबाबत ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या (एमसीआय) पथकाने सोमवारी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. चार डॉक्टरांच्या या पथकाने सकाळी ९ वाजतापासून ते रात्री उशिरापर्यंत बाह्यरुग्ण विभागापासून ते आंतररुग्ण विभाग, विद्यार्थ्यांचे वसतिगृह, एवढेच नव्हे तर सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयालाही भेट दिली. विशेष म्हणजे, तब्बल आठ वर्षांनंतर ‘एमसीआय’च्या पथकाकडून मेडिकलची तपासणी होत आहे.

Medical inspection by MCI team | एमसीआयच्या पथकाकडून मेडिकलची तपासणी

एमसीआयच्या पथकाकडून मेडिकलची तपासणी

Next
ठळक मुद्देएमबीबीएसच्या २०० जागांसाठी पाहणी : सकारात्मक अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एमबीबीएसच्या २०० जागांबाबत ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या (एमसीआय) पथकाने सोमवारी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. चार डॉक्टरांच्या या पथकाने सकाळी ९ वाजतापासून ते रात्री उशिरापर्यंत बाह्यरुग्ण विभागापासून ते आंतररुग्ण विभाग, विद्यार्थ्यांचे वसतिगृह, एवढेच नव्हे तर सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयालाही भेट दिली. विशेष म्हणजे, तब्बल आठ वर्षांनंतर ‘एमसीआय’च्या पथकाकडून मेडिकलची तपासणी होत आहे.
नागपूर मेडिकल महाविद्यालयाकडून दरवर्षी एमबीबीएसच्या २०० जागा भरल्या जातात. या जागेला घेऊन ‘एमसीआय’चे जे निकष आहेत, ते पाळले जातात का, हे पाहण्यासाठी हे पथक येते. गेल्या महिनाभरापासून या पाहणीला घेऊन मेडिकल प्रशासन कामाला लागले होते. पथक आकस्मिक येणार असल्याने प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी केली होती. सोमवारी सकाळी ९ वाजता डॉ. डी.डी. दत्तारॉय, डॉ. कविता राजरतन, डॉ. जुगलकिशोर कार व डॉ. ए.के. पांडे या चार सदस्यीय एमसीआय पथकाने अधिष्ठाता कार्यालयाला भेट दिली. तेथून पथकातील या चार डॉक्टरांनी वेगवेगळी पाहणी केली. यात बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, विविध वॉर्ड, शस्त्रक्रियागृह, ट्रॉमा केअर सेंटर, आंतररुग्ण विभाग, विद्यार्थ्यांचे क्रीडांगण, स्वयंपाकगृह, विद्यार्थ्यांचे वसतिगृह व सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयाचीही पाहणी केली.
बाह्यरुग्ण विभागात तीन हजारावर रुग्णांची गर्दी, खाटांच्या तुलनेत ९१ टक्के भरती असलेले रुग्ण, अद्यावत असलेली शस्त्रक्रियागृहे, वसतिगृहातील वातानुकूलित अभ्यास कक्ष, महाविद्यालयातील लेक्चरर्स हॉल व अपेक्षित असलेले मनुष्यबळ पाहून पथक सकारात्मक अहवाल देतील, अशी अपेक्षा केली जात आहे. विशेष म्हणजे, दरम्यानच्या काळात मेडिकलमध्ये पहिल्यांदाच पहिल्या दिवसाचे ‘एमसीआय’चे निरीक्षण विना गोंधळ सुरळीत पार पडले. याचे श्रेय अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना दिले जात आहे.
२५० जागांसाठी प्रयत्न!
मेडिकलमध्ये आवश्यक पायाभूत सोयी, यंत्रसामुग्री, रुग्णांची संख्या व उपलब्ध मनुष्यबळ पाहता एमबीबीएसच्या २०० वरून २५० जागांसाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी चर्चा आज वैद्यकीय शिक्षकांमध्ये होती. असे झाल्यास, वैद्यकीय क्षेत्राचे स्वप्न बाळगून असणाऱ्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल, सोबतच डॉक्टरांची संख्या वाढून रुग्णांना मदत मिळेल, असे बोलल्या जात आहे.
मेडिकलमधील शिक्षकांची स्थिती
प्राध्यापक ३५
सहयोगी प्राध्यापक १०६
सहायक प्राध्यापक १७०
वरिष्ठ निवासी डॉक्टर ८०
कनिष्ठ निवासी डॉक्टर ४००

Web Title: Medical inspection by MCI team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.