मेडिकल कॉलेज इस्पितळातील औषधे पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 08:22 PM2018-07-06T20:22:46+5:302018-07-06T20:27:00+5:30

शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी औषध भांडारात शिरल्याने औषधे पाण्यात भिजली. येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करीत भांडारातील पाणी बाहेर फेकणाºया दोन्ही मोटार सुरू केल्या तर औषधांचे डबे वऱ्हांड्यात ठेवल्याने मोठे नुकसान टळले.

In Medical hospital medicines were in rain water | मेडिकल कॉलेज इस्पितळातील औषधे पाण्यात

मेडिकल कॉलेज इस्पितळातील औषधे पाण्यात

Next
ठळक मुद्देवऱ्हांड्यात ठेवावा लागला औषधांचा ढीग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी औषध भांडारात शिरल्याने औषधे पाण्यात भिजली. येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करीत भांडारातील पाणी बाहेर फेकणाऱ्या दोन्ही मोटार सुरू केल्या तर औषधांचे डबे वऱ्हांड्यात ठेवल्याने मोठे नुकसान टळले.
मेडिकलचे जुने औषध भंडार विभाग हे तळमजल्याच्याही खाली आहे. सुमारे ६० वर्षे जुने असलेल्या भांडारात दरवर्षी पावसाचे पाणी शिरते. ते काढण्याकरीता दोन पंप लावण्यात आले आहे. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी विभागात शिरले. दोन्ही पंप सुरूही करण्यात आले. परंतु भांडारात पाणी शिरण्याचा ओघ मोठा असल्याने याचा फटका औषधांना बसला. कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवित पाण्यात भिजलेल्या औषधांचे बॉक्स वाळण्यासाठी व्हरांड्यात ठेवले. परंतु भिंतीतून पावसाचे पाणी झिरपत असल्याने बॉक्स खराब झाले. काही औषधे पाण्यात भिजल्याने रुग्णांसाठी त्याचा उपयोग होणार नसल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, हाफकिन कंपनीकडून आवश्यक त्या प्रमाणात औषधांचा पुरवठा अद्यापही मेडिकलला झाला नाही. यामुळे रुग्णालयात औषधांचा तुटवडा पडला आहे. रुग्णांना पदरमोड करून औषधे विकत घ्यावी लागत असताना औषधे भिजल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नऊ कोटींचे भांडार कोणासाठी?
मेडिकलमधील औषधे साठवून ठेवण्यासाठी २०१४ मध्ये ९ कोटी २१ लाख रुपये खर्चून नवीन औषधालय बांधण्याचे काम सुरू झाले. तीन माळ्यांची ही इमारत बांधकाम पूर्ण होऊन सहा महिन्यावर कालावधी झाला आहे. प्रत्येक माळ्यावर औषध साठवणुकीसाठी वातानुकूलित कक्षाची व्यवस्था आहे. मात्र, चार वर्षांचा कालावधी लोटूनही इमारतीत आवश्यक सोयी नसल्याने ही इमारत औषधे विभागाकडे हस्तांतरीत झाली नसल्याची माहिती आहे.

Web Title: In Medical hospital medicines were in rain water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.