मेयो : अखेर ‘एमआरआय’ची खरेदी प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:36 PM2019-04-19T23:36:27+5:302019-04-19T23:37:17+5:30

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) बहुप्रतीक्षित ‘एमआरआय’ यंत्राची खरेदी प्रक्रिया अखेर गुरुवारी पूर्ण झाली. पुढील १२ आठवड्यात हे यंत्र मेयोमध्ये स्थापन होणार आहे. या यंत्राच्या पाठोपाठ सिटी स्कॅन यंत्राची खरेदी प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

Mayo: Finally, the MRI purchase process is complete | मेयो : अखेर ‘एमआरआय’ची खरेदी प्रक्रिया पूर्ण

मेयो : अखेर ‘एमआरआय’ची खरेदी प्रक्रिया पूर्ण

googlenewsNext
ठळक मुद्दे१२ आठवड्यात यंत्र होणार स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) बहुप्रतीक्षित ‘एमआरआय’ यंत्राची खरेदी प्रक्रिया अखेर गुरुवारी पूर्ण झाली. पुढील १२ आठवड्यात हे यंत्र मेयोमध्ये स्थापन होणार आहे. या यंत्राच्या पाठोपाठ सिटी स्कॅन यंत्राची खरेदी प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
मेयो प्रशासनाचे गेल्या आठ वर्षांपासून ‘एमआरआय’ व नव्या सिटी स्कॅनसाठी प्रयत्न सुरू आहेत. नोव्हेंबर २०१६ रोजी ‘१.५ टेस्ला एमआरआय’साठी १० कोटी तर ‘१२८ स्लाईस सिटी स्कॅन’साठी ७ कोटी ५० लाखांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. २०१६ च्या हिवाळी अधिवेशनात या यंत्राला घेऊन चर्चाही झाली. परंतु आर्थिक तरतूद न झाल्याने हे दोन्ही यंत्र कागदावरच राहिले. ‘एमआरआय युनिट’ नसल्याच्या कारणाने ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (एमसीआय) मेयोतील ‘डिप्लोमा इन रेडिओ डायग्नोसिस’ची मान्यता काढून घेतली. शिवाय, ‘१६ स्लाईस सीटी स्कॅन’ यंत्र नसल्याची त्रुटी दाखवत ‘एमबीबीएस’च्या जागा धोक्यात आल्या होत्या. ‘एमसीआय’ने या संदर्भात मेयोला पत्रही पाठविले होते. हे दोन्ही यंत्र खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. यामुळे शिर्डीतील साईबाबा देवस्थान समितीने ३५ कोटी २८ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. मेयो प्रशासनाने हा निधी उपकरण खरेदीचे अधिकार असलेल्या ‘हापकिन्स’ कंपनीकडे वळता केला. याच दरम्यान संस्थानने निधी देऊनही ‘एमआरआय’ स्थापन करण्यात आले नसल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले. परिणामी, ३ जानेवारी २०१९ रोजी या निधीतून २५ कोटी इतक्या रकमेची यंत्रसामुग्री ‘टर्न-की’ तत्त्वावर खरेदी करण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली. ‘एमआरआय’ यंत्र कुठे स्थापन करावे याबाबतही गोंधळ उडाला होता. एमआरआय युनिट स्थापन करण्यासाठी बांधकामाला वेळ लागणार असल्याने तूर्तास वॉर्ड क्रमांक ४३ च्या तळमजल्यावर ‘एमआरआय युनिट’ विभाग सुरू करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी दिल्या. दुसरीकडे खरेदी प्रक्रियेला वेग आला. अखेर १८ एप्रिल रोजी १३ कोटी १० लाख ८६८ रुपयांच्या एमआरआय यंत्राच्या खरेदीचे आदेश निघाले. जर्मनी येथील सीमेन्स कंपनीचे हे यंत्र १२ आठवड्यांच्या आत मेयोत स्थापन होणार आहे. सूत्रानुसार, पुढील आठवड्यापर्यंत सिटी स्कॅनच्या खरेदीचे ऑर्डरही निघण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Mayo: Finally, the MRI purchase process is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.