महामॅरेथॉनच्या धावपटूंनी हाय फायबर, हाय प्रोटिन्स घ्यावे; आकाश भोजवानी यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:28 AM2018-01-18T11:28:47+5:302018-01-18T11:29:16+5:30

लोकमत महामॅरेथॉनचे आयोजन ११ फेब्रुवारीला होत आहे. आयोजनात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी हाय फायबर आणि हाय प्रोटिन्सयुक्त पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला ‘भोजवानी फूड्स लिमिटेड’ चे सीईओ आकाश भोजवानी यांनी दिला आहे.

Marathon runners should take hi-fiber, high-protein; Akash Bhojwani's advice | महामॅरेथॉनच्या धावपटूंनी हाय फायबर, हाय प्रोटिन्स घ्यावे; आकाश भोजवानी यांचा सल्ला

महामॅरेथॉनच्या धावपटूंनी हाय फायबर, हाय प्रोटिन्स घ्यावे; आकाश भोजवानी यांचा सल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमत महामॅरेथॉन २०१८

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत महामॅरेथॉनचे आयोजन ११ फेब्रुवारीला होत आहे. आयोजनात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी हाय फायबर आणि हाय प्रोटिन्सयुक्त पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला ‘भोजवानी फूड्स लिमिटेड’ चे सीईओ आकाश भोजवानी यांनी दिला आहे.
विशेष असे की, ‘भोजवानी फूड्स लिमिटेड’ मसाले आणि इन्स्टंट मिक्स पदार्थांच्या मार्केटमध्ये लोकप्रिय नाव आहे. आता फेब्रुवारीत आटा ‘सेगमेंट’मध्ये प्रवेश करणार असून, त्यात मल्टीग्रेन आटा लाँच करण्याची तयारीदेखील पूर्ण झाली आहे.
महामॅरेथॉनसंदर्भात विशेष चर्चेदरम्यान आकाश भोजवानी यांनी महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक वयोगटातील धावपटूंसाठी हाय फायबर आणि हाय प्रोटिन्सयुक्त पदार्थांची गरज असल्याचे सांगितले. पहिल्यांदा धावणाºया स्पर्धकांना तसेच बालकांना आणि प्रौढांना महामॅरेथॉनचा आनंद लुटण्याचा त्यांनी सल्ला दिला.
‘भोजवानी फूड्स लिमिटेड’ एक विशाल उपक्रम असून, देशातील ११ राज्यांत त्यांची व्याप्ती आहे, हे विशेष. या ११ राज्यांमध्ये ‘भोजवानी फूड्स लिमिटेड’ ची विविध उत्पादने ३० हजार आऊटलेट्सवर उपलब्ध आहेत.
कंपनी आपल्या आक्रमक मार्केटिंग धोरणांतर्गत लवकरच या आऊटलेट्सची संख्या दुप्पट करणार आहे. १९८४ साली ‘भोजवानी फूड्स लिमिटेड’ची स्थापना करण्यात आली. मालकांनी स्वत:च्या कठोर मेहनतीच्या बळावर एका मोठ्या ब्रॅन्डमध्ये रूपांतर केले.
आता नागपूर आणि महाराष्ट नव्हे तर संपूर्ण देशात अनेक घरांत किचनमध्ये ‘भोजवानी’ची ओळख झाली आहे. ग्राहकांच्या आरोग्याबद्दल सतर्कपणा आणि त्यांचे समाधान हेच ‘भोजवानी फूड्स लिमिटेड’ चे मुख्य उद्दिष्ट आहे. इन्स्टंट मिक्समध्ये चकली मिक्स, दहीवडा मिक्स, ढोकळा मिक्स, उपमा मिक्स आदी लोकप्रिय उत्पादने आहेत. याशिवाय ‘भोजवानी फूड्स’चे सिंगाडा आटा, राजगिरा आटा हे आधीपासून लोकप्रिय आहेत; शिवाय छोला मसाला, चाट मसाला या उत्पादनांनादेखील मोठी मागणी आहे.
सध्या सीईओ आकाश भोजवानी यांनी मसाले आणि इन्स्टंट मिक्ससह आटा ‘सेगमेंट’ आणि मल्टीग्रेन आटा, यावर सर्व लक्ष केंद्रित केले आहे.
मल्टीग्रेन आटा एक नवीन संकल्पना आहे. याबाबत भोजवानी यांनी सांगितले की, खेळाडूंसाठी हा आटा उपयुक्त तर असेलच, शिवाय सामान्य जनतेसाठीही हा आटा उत्तम आहे.
पुढील महिन्यात लाँच होणाऱ्या मल्टीग्रेन आटा याबाबत भोजनानी हे फारच उत्साहित आहेत. ते म्हणाले, ‘मल्टीग्रेन आटा निर्मितीसाठी शरबती गहू वापरले जातात. गहूंशिवाय अन्य पदार्थ यात असतील. तथापि, हा आटा अन्य आटापेक्षा अधिक पौष्टिक असेल. यात फायबर आणि प्रोटिन्सचे प्रमाण भरपूर असेल. व्हिटॅमिन्सचाही समावेश असेल.
भोजवानी यांनी मल्टीग्रेन आटा या उत्पादनाचे वैशिष्ट्य सांगितले. ते म्हणाले, ‘हा संतुलित आहार असेल. किंमतही अन्य आटासारखीच असेल. मल्टीग्रेन आटा निर्मितीवर मागील सहा महिन्यांपासून काम सुरू आहे. आता हे उत्पादन बाजारात आणण्याची तयारी सुरू आहे.

Web Title: Marathon runners should take hi-fiber, high-protein; Akash Bhojwani's advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.