महावितरण : ग्राहक जागृतीत जनसंपर्क विभाग आणि माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 09:24 PM2019-05-08T21:24:33+5:302019-05-08T21:26:02+5:30

जगभरात वीज वितरण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये महावितरण ही क्रमांक दोनची सर्वात मोठी कंपनी आहे. राज्यातील जवळपास अडीच कोटींपेक्षा अधिक वीज ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महावितरण सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवीत आहे. या सुविधांबाबत ग्राहकांमध्ये जागृती घडवून सकारात्मक प्रतिसाद मिळविण्यात महावितरणचा जनसंपर्क विभाग आणि प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी व्यक्त केले.

Mahavitaran: The role of Public Relations and Media in the consumer awareness is important | महावितरण : ग्राहक जागृतीत जनसंपर्क विभाग आणि माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण

प्रशिक्षणात सहभागी झालेल्या जनसंपर्क अधिकाऱ्यांसमवेत मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील, कार्यकारी अभियंता अनिल नागरे, देवेंद्र सायनेकर, समन्वयक सुषमा सावरकर आदी.

Next
ठळक मुद्देमुख्य जनसंपर्क अधिकारी पाटील यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरात वीज वितरण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये महावितरण ही क्रमांक दोनची सर्वात मोठी कंपनी आहे. राज्यातील जवळपास अडीच कोटींपेक्षा अधिक वीज ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महावितरण सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवीत आहे. या सुविधांबाबत ग्राहकांमध्ये जागृती घडवून सकारात्मक प्रतिसाद मिळविण्यात महावितरणचा जनसंपर्क विभाग आणि प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी व्यक्त केले.
महावितरणच्या जनसंपर्क विभागात कार्यरत अधिकाऱ्यांसाठी नाशिकस्थित व नव्याने स्थापन झालेल्या वीज व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्थेत आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी पाटील बोलत होते. प्रशिक्षण केंद्रातील कार्यकारी अभियंता अनिल नागरे, देवेंद्र सायनेकर, समन्वयक सुषमा सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक व कर्मचाºयांसाठी मोबाईल अ‍ॅप, वेब पोर्टलच्या माध्यमातून सर्व सेवा घरबसल्या व आॅनलाईन, अंतर्गत संगणकीकरण, डॅशबोर्ड आदींच्या माध्यमातून कामात सुलभता, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी आदी कामे प्रभावीपणे पूर्ण झाली आहेत. कंपनी व्यवस्थापन आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून काम करणाºया जनसंपर्क विभागासाठी प्रसारमाध्यम हे संवादाचे प्रभावी साधन आहे. ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा, माध्यमांमधील नवीन बदल, प्रवाह याबाबत सजग राहून जनसंपर्क विभाग आवश्यक त्या बदलासह ग्राहकसेवेत सज्ज आहे. हा विभाग अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी व्यवस्थापनही सकारात्मक आहे, असे पाटील म्हणाले.
प्रशिक्षणात सह मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, उप मुख्य जनसंपर्क अधिकारी भरत पवार, योगेश विटणकर, सुनील जाधव, जनसंपर्क अधिकारी अजित इगतपुरीकर, निशिकांत राऊत, धनंजय पवार, मोहन दिवटे, विकास पुरी, विकास आढे, आनंद कुमरे, फुलसिंग राठोड, ज्ञानेश्वर आर्दड, किशोर खोबरे, विश्वजित भोसले, विजयसिंह दुधभाते यांनी सहभाग घेतला.

Web Title: Mahavitaran: The role of Public Relations and Media in the consumer awareness is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.