महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरण ठरतोय पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 09:00 PM2018-12-06T21:00:53+5:302018-12-06T21:03:34+5:30

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) नागपूरचे महाराज बागच नाही तर राज्यातील चार प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली आहे. या प्राणिसंग्रहालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची निर्मिती केली आहे. शासनाने यंत्रणा उभारली असली तरी, अधिकारच नसल्याने या यंत्रणेचा कुठलाही उपयोग प्राणिसंग्रहालयाला होत नसल्यामुळे ‘सीझेडए’ ने नियमांवर बोट ठेवून प्राणिसंग्रहालयाच्या मान्यता रद्द केल्या आहेत.

Maharashtra state Zoo Authority becoming White Elephant | महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरण ठरतोय पांढरा हत्ती

महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरण ठरतोय पांढरा हत्ती

Next
ठळक मुद्देराज्यातील चार प्राणिसंग्रहालयाची मान्यता केली रद्द : महाराष्ट्र प्राधिकरणाला नाही कुठलाच अधिकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) नागपूरचे महाराज बागच नाही तर राज्यातील चार प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली आहे. या प्राणिसंग्रहालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची निर्मिती केली आहे. शासनाने यंत्रणा उभारली असली तरी, अधिकारच नसल्याने या यंत्रणेचा कुठलाही उपयोग प्राणिसंग्रहालयाला होत नसल्यामुळे ‘सीझेडए’ ने नियमांवर बोट ठेवून प्राणिसंग्रहालयाच्या मान्यता रद्द केल्या आहेत.
विशेष म्हणजे महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे मुख्यालय नागपुरात आहे. राज्यातील विविध प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनात एकवाक्यता यावी आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाशी प्रभावी समन्वयन साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण २०१५ मध्ये स्थापन करण्यात आले. राज्यात महानगरपालिका व खासगी संस्थांकडून चालविण्यात येत असलेल्या प्राणिसंग्रहालयांचे नियंत्रण तसेच नियमन, संकटग्रस्त प्राण्यांचे संवर्धन व प्रजनन, वन्यप्राण्यांचे आरोग्य व व्यवहारासंबंधी संशोधन कार्यक्रम राबविणे. राज्यातील प्राणिसंग्रहालयाकरीता इतर राज्य व विदेशातून विक्री तसेच अदलाबदलीद्वारे प्राणी उपलब्ध करून देणे, वने व वन्यजीव संवर्धन, प्राणिसंग्रहालयाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे, जनतेमध्ये व वन्यप्राण्यांबाबत आवड निर्माण करण्याकरिता जनजागृती करणे ही या प्राधिकरणाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्ट आहे.
संबंधित यंत्रणेकडून या उद्दिष्टांची पूर्तता होत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे प्राणिसंग्रहालयाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली यंत्रणाच नाही. प्राधिकरणाचे काम निव्वळ कागदोपत्री सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. सीझेडएकडून प्राणिसंग्रहालयाला वेळोवेळी मिळालेल्या निर्देशानुसार प्राणिसंग्रहालयाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. सीझेडएने चार प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली. ती मान्यता परत कशी मिळेल यासंदर्भात प्राधिकरण हतबल आहे. महाराष्ट्र प्राधिकरणाला कारवाईचे, आर्थिक अधिकार नसल्याने निव्वळ पांढरा हत्ती म्हणून हा विभाग शासन पोसत आहे.
अधिकार सीमित
शासनाने प्राधिकरण स्थापन केले. पण अधिकार दिले नाहीत. पत्रव्यवहाराव्यतिरिक्त प्राधिकरणकडून प्राणिसंग्रहालयाच्या बाबतीत काहीच होऊ शकत नाही. सीझेडएकडून आलेल्या सूचना, निर्देश प्राणिसंग्रहालयाला देणे एवढेच काम प्राधिकरणाचे असल्याचे एमझेडएच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
या संग्रहालयाच्या झाल्या मान्यता रद्द

  • सिद्धार्थ गार्डन औरंगाबाद
  • महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान, सोलापूर
  • महाराज बाग, नागपूर
  • आमटे अ‍ॅनिमल पार्क, गडचिरोली

 

Web Title: Maharashtra state Zoo Authority becoming White Elephant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.