Maharashtra Election Voting Live; विदर्भात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाडाच्या अनेक तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 08:20 AM2019-04-11T08:20:36+5:302019-04-11T08:21:12+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सुरूवातीलाच ईव्हीएम मशीनच्या बिघाडाची माशी शिंकली आहे.

Maharashtra Election Voting Live; Many complaints of failure of EVM machine in Vidharbha | Maharashtra Election Voting Live; विदर्भात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाडाच्या अनेक तक्रारी

Maharashtra Election Voting Live; विदर्भात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाडाच्या अनेक तक्रारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सुरूवातीलाच ईव्हीएम मशीनच्या बिघाडाची माशी शिंकली आहे. उन्हं तापायच्या आत सकाळी मतदान करावे या हेतूने सकाळी सात वाजण्याआधीच मतदान केंद्रांवर नागरिक बहुसंख्येने उपस्थित झाले. मात्र यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली आदी भागातील ईव्हीएम मशीन्सच्या बिघाडाने त्यांच्या उत्साहावर पाणी पडले. गोंदियाच्या रामनगर मतदान केन्द्रातील २७६ बुथ वर मतदान सुरु होण्या आधी व्ही व्ही पी टी ए मशीन मध्ये बिघाड झाल्याने मतदान केंद्रवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यवतमाळातील दाते कॉलेज मतदान केंद्रावर ईव्हीएम सुमारे पाऊण तास उशीराने सुरू झाले. गडचिरोलीत लाईट नसल्याने मतदारांचा खोळंबा झाला.

Web Title: Maharashtra Election Voting Live; Many complaints of failure of EVM machine in Vidharbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.