महामेट्रोच्या पायडल, ई-सायकल व ई-स्कूटर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:59 PM2019-01-31T23:59:58+5:302019-02-01T00:03:07+5:30

स्टेशनवरून उतरल्यानंतर सायकलने डेस्टिनेशनवर जाण्यासाठी महामेट्रोने प्रदूषणमुक्त आणि वाहतुकीला सुलभ अशा देशातील पहिल्या स्मार्ट अर्बन मोबिलिटी सोल्युशनचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते गुरुवारी एअरपोर्ट साऊथवर स्टेशनवर करण्यात आले.

Mahamatro's, e-cycle and e-scooter ready | महामेट्रोच्या पायडल, ई-सायकल व ई-स्कूटर दाखल

महामेट्रोच्या पायडल, ई-सायकल व ई-स्कूटर दाखल

Next
ठळक मुद्देसुलभ वाहतूक व्यवस्था : प्रवाशांना स्टेशनवरून डेस्टिनेशनवर जाण्याची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्टेशनवरून उतरल्यानंतर सायकलने डेस्टिनेशनवर जाण्यासाठी महामेट्रोने प्रदूषणमुक्त आणि वाहतुकीला सुलभ अशा देशातील पहिल्या स्मार्ट अर्बन मोबिलिटी सोल्युशनचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते गुरुवारी एअरपोर्ट साऊथवर स्टेशनवर करण्यात आले.
स्मार्ट अर्बन मोबिलिटी सोल्युशन बाऊन्स कंपनीच्या सहकार्याने महामेट्रोने ही सेवाआणली आहे. या अंतर्गत पायडल सायकल, ई-सायकल, ई-स्कूटर दाखल केली. प्रवाशांना सायकलकरिता १० मिनिटांसाठी १ रुपया भाडे द्यावे लागेल. अ‍ॅप डाऊनलोड करून क्यूआर कोड लॉकला दाखवायचा आहे. मल्टिमॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत फर्स्ट टू लास्ट माईल, नॉन मोटराईज्ड ट्रान्सपोर्ट अशी संकल्पना असून याद्वारे प्रत्येक प्रवाशाला स्टेशनवरून वाहतुकीची सुलभ यंत्रणा उपलब्ध होणार आहे. याकरिता मनपा, एनएचएआय आणि पीडब्ल्यूडीसोबत करार करण्यात येणार आहे. ई-रिक्षाने सहभाग नोंदविला आहे. मिहानमध्ये अनेक कंपन्यांनी या सुविधेची मागणी केली आहे. सायकल वा ई-स्कूटर स्टेशनवरून उतरल्यानंतर प्रवाशाला डेस्टिनेशनवर सोडायची आहे. याशिवाय प्रवाशांना स्टेशनवरून कोणत्याही वाहतुकीच्या साधनांचा उपयोग करता येणार आहे. ही यंत्रणा महामेट्रोच्या प्रत्येक स्टेशनवर राहणार आहे.
मेट्रोत ‘नारी शक्ती कोच’
नागपुरातील महिला संघटनांच्या मागणीनुसार महामेट्रोमध्ये असलेल्या तीन कोचपैकी एक कोच महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ‘नारी शक्ती कोच’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना दिवसरात्र सुरक्षित प्रवास करता येईल. तिकिटावर असलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून प्रवाशांना स्टेशनवर प्रवेश करता येईल.
१९ कि़मी. व आठ स्टेशनचे काम फेब्रुवारीअखेर पूर्ण होणार
फेब्रुवारीअखेरीस वा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. या संदर्भात पत्रव्यवहार पंतप्रधान कार्यालयासोबत करण्यात आला आहे. कामाला गती देतानाच रिच-१ मध्ये खापरी ते सीताबर्डीपर्यंत १३ कि़मी. अंतर व सहा स्टेशन आणि रिच-३ मध्ये लोकमान्यनगर ते सुभाषनगरपर्यंत सहा कि़मी. अंतर व दोन स्टेशनचे काम फेब्रुवारीअखेर पूर्ण होणार आहे. रिच-१ मध्ये खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट, जयप्रकाशनगर, सीताबर्डी आणि रिच-३ मध्ये लोकमान्यनगर आणि सुभाषनगर स्टेशनचा समावेश आहे. मेट्रोच्या एकूण १९ कि़मी. मार्गावर मेट्रो व्यावसायिकरीत्या धावणार आहे. स्टेशनचे बांधकाम करणारी कंपनी आयएल अ‍ॅण्ड एफएसचे दिवाळे निघाल्यानंतर कंपनीचे काम बंद झाले. पण महामेट्रोने २५ कंत्राटदारांच्या माध्यमातून स्टेशनचे बांधकाम करण्यात येत आहे.

Web Title: Mahamatro's, e-cycle and e-scooter ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.