निपाह व्हायरसवर पारिजातकाची पाने गुणकारी असल्याचा मेजेस सध्या चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:57 PM2018-05-25T16:57:23+5:302018-05-25T16:57:54+5:30

Magazines currently on the nipah virus are good for eczema leaves | निपाह व्हायरसवर पारिजातकाची पाने गुणकारी असल्याचा मेजेस सध्या चर्चेत

निपाह व्हायरसवर पारिजातकाची पाने गुणकारी असल्याचा मेजेस सध्या चर्चेत

Next
ठळक मुद्देनिपाहची नागरिकांच्या मनात धास्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: निपाह व्हायरसवर पारिजातकाची पाने गुणकारी असल्याचा मेसेज सध्या वॉटसअपवरील सर्वात जास्त वाचला व चर्चिला जाणारा विषय ठरू पाहतो आहे.
केरळमध्ये सध्या निपाह व्हायरस थैमान घालत आहे. त्यावर काहीच उपाय नाही असेही सांगितले जाते आहे. त्यामुळेच त्याची धास्ती नागरिकांच्या मनात जास्त पक्की होत चालली आहे.
अशातच सिद्ध उपचार पद्धतीनुसार पारिजातकांच्या पानांचा काढा यावर हमखास गुणकारी असल्याचे या मेजेसमध्ये दिले आहे.

काय आहे हा उपचार?
निपाह व्हायरसची लागण झालेल्या रुग्णास द्यावयाचा काढा बनवण्याची पद्धत या मेसेजमध्ये दिली आहे. तीनुसार, २०० मि.ली. पाण्यात पारिजातकाच्या झाडाची पूर्ण वाढ झालेली मूठभर पाने बारीक करून व स्वच्छ धुवून टाकावीत. हे पाणी १०० मि.ली. उरेपर्यंत आटवावे. त्यात दोन काळे मिरे ठेचून टाकावे. पाणी थोडे कोमट झाल्यावर त्यात लिंबाच्या रसाचे तीन थेंब टाकावेत. हा काढा दिवसातून तीनदा घ्यावा. निपाह व्हायसरसारख्या आजारांवर तो हमखास गुणकारी ठरतो.
निपाह व्हायरससारख्या आजारांचा उल्लेख सिद्ध उपचार पद्धतीत आढळून येतो म्हणजेच हे आजार फार प्राचीन काळीही भेडसावत होते असाच यातून अर्थ काढता येऊ शकेल.

Web Title: Magazines currently on the nipah virus are good for eczema leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.