अ.भा. मराठी बालरंगभूमी नागपूर शाखा अध्यक्षपदी मधुरा गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:15 AM2019-05-21T10:15:27+5:302019-05-21T10:15:56+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी बालरंगभूमीच्या नागपूर शाखेच्या अध्यक्षपदी मधुरा सारंग गडकरी यांची निवड करण्यात आली आहे.

Madhura Gadkari is the Chairman of Marathi Balrangbhumi Nagpur Branch | अ.भा. मराठी बालरंगभूमी नागपूर शाखा अध्यक्षपदी मधुरा गडकरी

अ.भा. मराठी बालरंगभूमी नागपूर शाखा अध्यक्षपदी मधुरा गडकरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी बालरंगभूमीच्या नागपूर शाखेच्या अध्यक्षपदी मधुरा सारंग गडकरी यांची निवड करण्यात आली आहे. शाखेची कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली. ६ एप्रिल २०१९ रोजी स्थापन झालेल्या मराठी बालरंगभूमी नागपूर शाखेच्या कार्यकारिणी निवडीची सभा नंदनवन येथील महिला महाविद्यालयात रविवारी पार पडली. अ.भा.मराठी नाट्य परिषदेचे नागपूर शाखा अध्यक्ष प्रफुल्ल फरकासे यांच्या अध्यक्षतेत व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी संजय वलीवकर, उपाध्यक्ष शोभा फडणवीस, आभा मेघे, संजय भरडे, प्रमुख कार्यवाह रोशन नंदवंशी, सहकार्यवाह विलास कुबडे, अमोल निंबर्ते, वैदही रोहितकर, कोषाध्यक्ष संजय रहाटे, प्रवक्ता अ‍ॅड. रमण सेनाड तर कार्यकारिणी सदस्य म्हणून रश्मी फडणवीस, योगेश राऊत, स्नेहल जोशी, संजय गायकवाड, नितीन पात्रीकर यांची निवड करण्यात आली.

Web Title: Madhura Gadkari is the Chairman of Marathi Balrangbhumi Nagpur Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.