लोकमत शुभवर्तमान : आता मी क्रिकेट खेळू शकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:35 PM2019-02-25T22:35:05+5:302019-02-25T22:38:15+5:30

लोकेश पोट्टावी. वय वर्ष १३. राहणार गडचिरोली. जन्मत:च दोन्ही हात आणि दोन्ही पाय वाकडे. वैद्यकीय भाषेत याला ‘ऑर्थाेग्रायफोर्सिस मल्टीप्लेक्स कन्जेनायटा’ म्हणतात. वाकड्या हातपायामुळे त्याला रोजची स्वत:ची कामे करणेही अवघड. यातच त्याच्याकडे पाहणाऱ्या नजरांमुळे तो स्वत:वरच चिडायचा. आई-वडिलांकडे नाना प्रश्न विचारायचा. याच दरम्यान त्याच्या गावात लागलेल्या एका आरोग्य शिबिरात डॉ. विरज शिंगाडे यांच्याशी भेट झाली. त्यांनी त्याला नागपुरातील हॉस्पिटलमध्ये आणले.त्याच्यासोबत त्याच्या आई-वडिलांची राहण्याची, जेवणाची सोय केली. नि:शुल्क शस्त्रक्रिया केली. औषधोपचार केला. गेल्यावर्षी त्याचा एक पाय सरळ तर दुसऱ्या पायावर शनिवारी शस्त्रक्रिया झाली. दोन्ही पाय सरळ झाल्याने, आता तू काय करणार, या प्रश्नावर लोकेशने आता मी क्रिकेट खेळणार, असे पटकन उत्तर दिले. त्याच्या आईने त्याला कुशीत घेतले. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते.

Lokmat Shubha Vartaman: Now I can play cricket | लोकमत शुभवर्तमान : आता मी क्रिकेट खेळू शकणार

लोकमत शुभवर्तमान : आता मी क्रिकेट खेळू शकणार

Next
ठळक मुद्देवाकड्या पायावरील शस्त्रक्रियेनंतर लोकश झाला भावूक : १३ वर्षांत २९०० बालकांचे अपंगत्व दूर

सुमेध वाघमारे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकेश पोट्टावी. वय वर्ष १३. राहणार गडचिरोली. जन्मत:च दोन्ही हात आणि दोन्ही पाय वाकडे. वैद्यकीय भाषेत याला ‘ऑर्थाेग्रायफोर्सिस मल्टीप्लेक्स कन्जेनायटा’ म्हणतात. वाकड्या हातपायामुळे त्याला रोजची स्वत:ची कामे करणेही अवघड. यातच त्याच्याकडे पाहणाऱ्या नजरांमुळे तो स्वत:वरच चिडायचा. आई-वडिलांकडे नाना प्रश्न विचारायचा. याच दरम्यान त्याच्या गावात लागलेल्या एका आरोग्य शिबिरात डॉ. विरज शिंगाडे यांच्याशी भेट झाली. त्यांनी त्याला नागपुरातील हॉस्पिटलमध्ये आणले.त्याच्यासोबत त्याच्या आई-वडिलांची राहण्याची, जेवणाची सोय केली. नि:शुल्क शस्त्रक्रिया केली. औषधोपचार केला. गेल्यावर्षी त्याचा एक पाय सरळ तर दुसऱ्या पायावर शनिवारी शस्त्रक्रिया झाली. दोन्ही पाय सरळ झाल्याने, आता तू काय करणार, या प्रश्नावर लोकेशने आता मी क्रिकेट खेळणार, असे पटकन उत्तर दिले. त्याच्या आईने त्याला कुशीत घेतले. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते.
गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात आरोग्य शिबिरातून जन्मजात किंवा जळाल्यामुळे किंवा आजारामुळे अस्थिव्यंगाच्या व्याधीने पीडित असलेल्या लोकेशसारख्या गरीब व गरजू २९०० बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना त्यांच्या पायावर उभे केले जात आहे. त्यांच्या आयुष्यातील अंधारावर मात करून त्यांना स्वयंप्रकाशित होण्याचा अर्थही सांगितला जात आहे. मागासलेल्या व दुर्गम भागातील मुलांमध्ये ही नवी ऊर्जा पेरणेचे काम नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठानतर्फे सलग १३ वर्षांपासून सुरू आहे. १२ फेब्रुवारीपासून पुन्हा या शिबिराला सुरुवात झाली. यावेळी ११४ मुलामुलींची निवड करण्यात आली. त्यांना नागपुरात आणून आतापर्यंत ६० मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. लवकरच उर्वरित मुलांवर शस्त्रक्रिया होणार आहे.
‘लोकमत’शी बोलताना प्रसिद्ध पेडियाट्रिक ऑर्थाेपेडिक सर्जन डॉ. शिंगाडे म्हणाले, या कार्याची सुरुवात २००६ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातून झाली. सेरेब्रल पाल्सी व मतिमंदता, क्लब फूट, कमी उंची असणे, जळल्यामुळे आलेले हातपायाचे व्यंग, मुलांच्या सांध्याला सूज येणे, पाचपेक्षा जास्त बोटे असणे, जन्मत: असलेले अस्थिव्यंग, मुलांच्या हाडांचे इन्फेक्शन, मानेचा तिरळेपणा, हातपाय वाकडे असणे, हातपाय लहान असणे, मुलांचा विकास वेळेवर न होणे, मूल लंगडत चालणे, हिप जॉईंटचे डिस्लोकेशन असणाऱ्या मुलांवर कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया केल्या जात आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांचे व्यंग पूर्ण दूर होण्यासाठी फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी नि:शुल्क दिल्या जाते.
तालुकास्तरावर शिबरे घेऊन केली जाते निवड
या शस्त्रक्रियेपूर्वीची तपासणी तालुका स्तरावर शळेतील शिक्षकांच्या मदतीने शिबिरे घेऊन केली जातात. ज्या मुलांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, अशा मुलांना नागपूर येथील डॉ. शिंगाडे यांच्या चिल्ड्रेन आर्थाेपेडीक केअर इन्स्टिट्यूटमध्ये आणून शस्त्रक्रिया केल्या जातात. दानदात्यांच्या माध्यमातून हे सेवाकार्य अखंडित सुरू आहे. गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांचे विशेष सहकार्य मिळत आहे. सेवा कार्याला वास्तविकतेचे स्वरुप देण्यासाठी अस्थिव्यंग सर्जन डॉ. विराज शिंगाडे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. रश्मी शिंगाडे, डॉ. सुहास अंबादे, डॉ. दीपाली मंडलिक, प्लास्टिक सर्जन डॉ. तरुण देशभ्रत्तार, पॅथालॉजिस्ट डॉ. नितीन राठी, बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद मंडलिक, फिजीओथेरपीस्ट डॉ. प्राजक्ता तळेले, डॉ. दर्शना आवळे, डॉ. साक्षी वेदी, डॉ. अल्पना मुळे, डॉ. अल्पना पाहुजा, डॉ. तेजल तुरकर, डॉ. संगीता टाकोणे, डॉ. रेणुका नाईक,भाऊ उकरे, अविनाश पिंपळशेंडे व नांदेकर सेवा देत आहेत.

Web Title: Lokmat Shubha Vartaman: Now I can play cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.