Lok Sabha Election 2019; अधिकारी आणि ड्रायव्हर दोघेही पोलिंग ऑफिसर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:06 AM2019-03-23T10:06:14+5:302019-03-23T10:06:39+5:30

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी शासकीय कामातील कर्मचाऱ्यांना निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी आमंत्रित केले आहे.

Lok Sabha Election 2019; Both officer and drivers are policing officers? | Lok Sabha Election 2019; अधिकारी आणि ड्रायव्हर दोघेही पोलिंग ऑफिसर?

Lok Sabha Election 2019; अधिकारी आणि ड्रायव्हर दोघेही पोलिंग ऑफिसर?

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी शासकीय कामातील कर्मचाऱ्यांना निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी आमंत्रित केले आहे. यात वर्ग एकच्या अधिकाऱ्यापासून वर्ग ४ च्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळालेल्या पत्रात वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना आणि ड्रायव्हरलाही निवडणुकीत एकाच कामासाठी आमंत्रित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कामाचे वाटप करताना वर्ग १ च्या अधिकाऱ्याला झोन स्तरावर, वर्ग २ च्या कर्मचाऱ्यांना प्रिसायडिंग ऑफिसर, वर्ग ३ च्या पोलिंग ऑफिसर अशा वर्गवारीत काम मिळायला हवे. पण निवडणूक अधिकारी कार्यालयातून मिळालेल्या पत्रामध्ये वर्ग १ च्या काही अधिकाऱ्यांना पोलिंग ऑफिसर आणि वर्ग ३, ४ च्या कर्मचाऱ्यांनाही पोल्ािंग ऑफिसर हेच कार्य देण्यात आले. ड्रायव्हरच्या हे लक्षात आल्याने त्यांनी ही बाब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्याने त्यांच्याकडून हा कार्यभार काढून घेण्यात आला. काही वर्ग १ व २ च्या अधिकाऱ्यांनीही त्यांना अपेक्षित असलेले निवडणुक ीचे कार्य मिळाले नसल्यामुळे काहींनी तक्रार केली, तर काहींनी मिळालेले कार्य राष्ट्रीय कार्य समजून स्वीकार केला.

Web Title: Lok Sabha Election 2019; Both officer and drivers are policing officers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.