नागपुरातील  लोक न्यायालयाच्या पॅनलमध्ये तृतीयपंथी विद्याचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 12:41am

लोक न्यायालयामधील प्रकरणांवर निर्णय देणाऱ्या पॅनलमध्ये तृतीयपंथी विद्या कांबळे यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. समाजात वावरताना सतत अवहेलना व उपेक्षा सहन करणाऱ्या तृतीयपंथीयांचा आत्मसन्मान यामुळे वाढणार आहे. तसेच, समाजात सकारात्मक संदेश जाणार आहे.

नागपूर : लोक न्यायालयामधील प्रकरणांवर निर्णय देणाऱ्या पॅनलमध्ये तृतीयपंथी विद्या कांबळे यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. समाजात वावरताना सतत अवहेलना व उपेक्षा सहन करणाऱ्या तृतीयपंथीयांचा आत्मसन्मान यामुळे वाढणार आहे. तसेच, समाजात सकारात्मक संदेश जाणार आहे. शनिवारी नागपूर जिल्हा न्यायालयात लोक न्यायालय आयोजित करण्यात आले आहे. त्यातील प्रकरणांवर निर्णय देण्यासाठी पॅनल स्थापन करण्यात आले आहेत. एका पॅनलमध्ये एक न्यायाधीश, एक वकील व एक अन्य सदस्याचा समावेश असतो. विद्या कांबळे यांना सदस्य होण्याचा मान मिळाला आहे. कांबळे गेल्या १० वर्षांपासून तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढत आहेत. पॅनलमध्ये नियुक्ती झाल्यामुळे त्यांनी न्यायाधीश व वकिलांच्या मार्गदर्शनाखाली खटल्यांचा अभ्यास केला आहे, अशी माहिती मिळाली.

संबंधित

नागपुरात इंडियन रोड काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन २२ पासून
चाकू हल्ल्यात एक गंभीर जखमी : भांडण करणाऱ्यांना हटकणे भोवले
फटाके उडवल्याप्रकरणी सोलापुरात १३६ जणांवर गुन्हे दाखल
नवदाम्पत्याची परदेश सहल हुकविणाऱ्या कंपनीला दणका
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आणखी घसरण

नागपूर कडून आणखी

कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे दर्शन
सत्तेशिवाय मातोश्रीची चुल पेटणार नाही: नारायण राणे
आॅटोरिक्षाची बेलगाम पार्किंग ठरतेय डोकेदुखी
कठोर परिश्रमातूनच यशप्राप्ती
१२५ कोटींचा प्रस्ताव गेला कुठे? सक्करदरा तलावातील पाण्याला हिरवा रंग

आणखी वाचा