नागपूर जिल्ह्यात चालकाच्या सतर्कतेने रेल्वे अपघात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 09:53 AM2019-05-22T09:53:22+5:302019-05-22T09:58:47+5:30

शेतशिवारात आग लावल्याने जळालेले बाभळीचे झाड रेल्वे रुळावर पडले. ही बाब चालकाच्या लक्षात येताच ब्रेक लावत रेल्वे थांबविण्यात आली.

Loco pilot's presence of mind; avoid train accident in Nagpur | नागपूर जिल्ह्यात चालकाच्या सतर्कतेने रेल्वे अपघात टळला

नागपूर जिल्ह्यात चालकाच्या सतर्कतेने रेल्वे अपघात टळला

Next
ठळक मुद्देरेल्वे रुळावर झाड पडले इतवारी-नागभीड पॅसेंजर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतशिवारात आग लावल्याने जळालेले बाभळीचे झाड रेल्वे रुळावर पडले. दरम्यान या रेल्वे रुळावरून दुपारी १ वाजताच्या सुमारास इतवारी नागपूर रेल्वे स्थानक ते नागभीडकडे जाणारी पॅसेंजर धावत होती. अशातच कारगाव शिवारात झाड रेल्वे रूळावर पडल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच ब्रेक लावत रेल्वे थांबविण्यात आली. अगदी झाडाच्या काही अंतरावरच रेल्वे थांबली. चालकाने वेळीच सतर्कता दाखविल्याने अपघात टळला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनाक्रमामुळे सदर रेल्वे सुमारे १५ मिनिटे उशिरा धावली. दिनेश येरणे असे चालकाचे तर एस. डी.चांदेकर असे गार्डचे नाव आहे.
पॅसेंजरमध्ये साधारणत: ७०० प्रवासी प्रवास करीत होते, अशी माहिती भिवापूर रेल्वेस्थानकाचे स्टेशन मास्तर प्रशांतकुमार यांनी दिली.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ अंतर्गत नागपूर ते नागभीड आणि नागभीड ते नागपूर अशा दिवसभरात एकूण आठ फेऱ्या सदर पॅसेंजरच्या होतात. नागपूर इतवारी रेल्वेस्थानकावरून मंगळवारी सकाळी १०.४० ला ५८८४५ क्रमांकाची पॅसेंजर नागभीडच्या दिशेने निघाली. सदर रेल्वे उमरेड स्थानकावर दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी पोहचली. अशातच कारगाव शिवारात रेल्वे पोहचताच रेल्वे रुळावरच जळालेले काटेरी झाड पडले होते. चालक दिनेश येरणे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी प्रसंगावधान साधत अगदी अचूक क्षणाला रेल्वे थांबविली. अचानकपणे रेल्वे थांबल्याने प्रवासी भयभीत झाले होते. लागलीच झाड पडल्याची बाब लक्षात येताच काही प्रवाशांनी हे झाड बाजूला करण्यासाठी पुढाकार घेतला. १५ ते २० मिनिटात झाड बाजूला केल्यानंतर सदर रेल्वे भिवापूरच्या दिशेने निघाली.
अद्याप पत्र नाही
नागपूर नागभीड रेल्वेचे रुंदीकरण होणार असल्याचे नूकतेच जाहीर करण्यात आले. यानंतर मागील काही महिन्यांपासून सदर रेल्वे मार्ग बंद होणार असल्याच्या बाबी चर्चेत आहे. याबाबत उमरेडचे स्टेशन मास्तर आर. के. सिन्हा यांच्याकडे विचारणा केली असता, रेल्वे मार्ग बंदबाबतचे कोणतेही पत्र आमच्याकडे नसल्याची बाब त्यांनी सांगितली. हजारो प्रवासी सदर रेल्वेने दररोज प्रवास करतात.

Web Title: Loco pilot's presence of mind; avoid train accident in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे