A license to carry arms is required | निवडणूक काळात शस्त्र बाळगण्याचा परवाना आवश्यक
निवडणूक काळात शस्त्र बाळगण्याचा परवाना आवश्यक

ठळक मुद्देअतिरिक्त जिल्हादंडाधिकाऱ्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ निर्भय, शांततामय, न्याय्य वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्याकरिता निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणतीही अनुचित घटना घडू नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, यासाठी नागपूर ग्रामीण व जिल्ह्यात २७ मे २०१९ पर्यंत परवानाप्राप्त अग्निशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा स्वत: जवळ बाळगण्यास व सोबत वाहून नेण्यास मनाई करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आलेले आहे. परंतु अशा सुरक्षा कर्मचाऱ्याकडून निवडणूक कालावधीमध्ये त्यांच्याकडील शस्त्रांचा गैरवापर होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँका, संस्थेच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेली आहे. छाननी समितीच्या २३ फेब्रुवारीच्या सभेत परवानाधारक व्यक्तींना निवडणूक कालावधीत स्वत:जवळ शस्त्र बाळगण्याची, वाहून नेण्याची आवश्यकता असेल. अशा व्यक्तींना वरीलप्रमाणे आदेश निर्गमित झाल्यापासून १० दिवसांत नागपूर विनंती अर्ज दाखल करायचा आहे.


Web Title: A license to carry arms is required
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.