कोणत्याही आरटीओमधून मिळणार लायसन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:27 AM2017-07-24T02:27:18+5:302017-07-24T02:27:18+5:30

आरटीओने सुरू केलेल्या शिकावू वाहन परवानासाठी (लर्निंग लायसन्स) आॅनलाईन अपॉईंटमेंट योजनेत

License from any RTO | कोणत्याही आरटीओमधून मिळणार लायसन्स

कोणत्याही आरटीओमधून मिळणार लायसन्स

Next

शहर आरटीओचा पुढाकार : अपॉर्इंटमेंटची प्रतीक्षा कमी होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरटीओने सुरू केलेल्या शिकावू वाहन परवानासाठी (लर्निंग लायसन्स) आॅनलाईन अपॉईंटमेंट योजनेत उमेदवाराला सोयीनुसार अपॉर्इंटमेंट मिळत नाही. यावर उपाय म्हणून नागपूर शहर आरटीओ कार्यालयाने कोणत्याही आरटीओ कार्यालयामधून लर्निंग लायसन्सची प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना तयार केली असून लवकरच ती कार्यान्वित होणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी राज्यभरात शिकाऊ व पक्क्या वाहन परवानासाठी ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ योजना सुरू करण्यात आली. शहरात १७ सप्टेंबर २०१४ पासून या योजनेची सक्ती करण्यात आली. परंतु तीन वर्षांचा कालावधी होऊनही नागपूर शहर, ग्रामीण आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आॅनलाईन अपॉर्इंटमेंटचा गोंधळ कायम आहे. संबंधित संकेत स्थळावर विविध आॅप्शन आणि अमुक बटनांवर क्लिक करण्याच्या अनेक सूचनांमुळे आॅनलाईन अपॉईंटमेंट सामान्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. परिणामी हा अर्ज भरून देण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या परिसरातच अनेकांनी लॅपटॉप ठेवून दुकाने थाटली आहे. उमेदवाराला १०० ते ५०० रुपयापर्यंतचा भुर्दंड पडत आहे.
दुसरीकडे अपॉर्इंटमेंट दोन-तीन महिन्याच्या कालावधीनंतर मिळत आहे. यातून मार्ग काढत वाहन परवाना अर्जदारांना सोयीचे व्हावे, अपॉर्इंटमेंटची प्रतीक्षा कमी व्हावी, म्हणून शहर आरटीओ कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी, शहरातील ज्या आरटीओ कार्यालयात सोयीनुसार अपार्इंटमेंट मिळत आहे तिथे संगणक परीक्षा देऊन पास झाल्यास शिकाऊ परवाना देण्याची योजना तयार केली. दोन महिन्यांपूर्वी तसा प्रस्ताव परिवहन आयुक्तांकडे पाठविला. तेथून हा प्रस्ताव ‘एनआयसी’कडे (राष्ट्रीय माहिती सेवा केंद्र) गेला आहे. अद्याप याला मंजुरी मिळाली नसली तरी प्राथमिक स्वरूपात ही योजना राबविण्याची तयारी सुरू आहे.

आॅगस्टपासून क्रियान्वित करण्याचा प्रयत्न
शहरातील कोणत्याही आरटीओ कार्यालयातून शिकावू वाहन परवाना काढण्याची योजना आॅगस्ट महिन्यापासून सुरू करण्याचा प्रयत्न आहे. हा परवाना मिळाल्यानंतर उमेदवाराला त्याच्या संबंधित आरटीओ कार्यालयातूनच पक्क्या वाहन परवानासाठी अर्ज करावा लागेल. यामुळे सोईनुसार अपॉर्इंटमेंट मिळू शकेल.
-शरद जिचकार
प्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ नागपूर शहर.

Web Title: License from any RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.