मनुष्यबळाचा अभाव : उपराजधानी स्वच्छतेत कशी येणार अव्वल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 01:05 AM2018-09-16T01:05:16+5:302018-09-16T01:06:04+5:30

स्वच्छतेत नागपूर शहराचा क्रमांक धरला तरी पुढच्या वेळी अव्वल क्रमांक येईलच, असा दावा पदाधिकारी व अधिकारी करीत आहेत. शहरातील ३० लाख नागरिकांचीही अशीच इच्छा आहे. परंतु स्वच्छता अभियान राबविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या आरोग्य (स्वच्छता) विभागात महत्त्वाची जवळपास सर्वच पदे रिक्त आहेत. कर्मचारी असो वा मजूर अशी बहुसंख्य पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. अशापरिस्थितीत स्वच्छतेत उपराजधानी अव्वल कशी येणार, असा प्रश्न विभागाला पडला आहे.

Lack of human power: How will the sub-capital first in clean? | मनुष्यबळाचा अभाव : उपराजधानी स्वच्छतेत कशी येणार अव्वल?

मनुष्यबळाचा अभाव : उपराजधानी स्वच्छतेत कशी येणार अव्वल?

Next
ठळक मुद्देअभियान राबविणाऱ्या आरोग्य विभागात उपसंचालक, आरोग्य अधिकारीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छतेत नागपूर शहराचा क्रमांक धरला तरी पुढच्या वेळी अव्वल क्रमांक येईलच, असा दावा पदाधिकारी व अधिकारी करीत आहेत. शहरातील ३० लाख नागरिकांचीही अशीच इच्छा आहे. परंतु स्वच्छता अभियान राबविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या आरोग्य (स्वच्छता) विभागात महत्त्वाची जवळपास सर्वच पदे रिक्त आहेत. कर्मचारी असो वा मजूर अशी बहुसंख्य पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. अशापरिस्थितीत स्वच्छतेत उपराजधानी अव्वल कशी येणार, असा प्रश्न विभागाला पडला आहे.
डॉ. मिलिंद गणवीर निवृत्त झाल्यापासून आरोग्य उपसंचालकाचे पद रिक्त आहे. मागील काही वर्षांपासून आरोग्य अधिकारी, अतिरिक्त आरोग्य अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. निरीक्षण विभागात वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांची ३६ पदे मंजूर आहेत. यातील तब्बल ३० पदे रिक्त आहेत. कनिष्ठ स्वच्छता निरीक्षकांची १९ पदे मंजूर असून, १८ जागा रिक्त आहेत. मोहरीरच्या ३० पैकी २५ जागा रिक्त असून, स्वच्छता अधीक्षकांची ७ पदे मंजूर असून यातील ४ पदे रिक्त आहेत. मजुरांची ६४ पदे मंजूर असून, यातील २१ पदे तर लॉरी चालकाच्या मंजूर ५१ पदांपैकी २६ पदे रिक्त आहेत.
महापालिका सेवेतून दर महिन्याला ३० ते ३५ कर्मचारी व शिक्षक निवृत्त होतात. वर्षाला ३०० ते ३५० कर्मचारी सेवानिवृत्त होतात. २०२० पर्यंत महापालिकेतील बहुसंख्य कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. दुसरीकडे भरतीची प्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदाचा अतिरिक्त प्रभार दुसºया कर्मचाºयावर सोपविला जातो. परंतु मंजूर पदाच्या निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्याने याचा कामकाजावर परिणाम होत आहे. अर्थातच याचा फटका स्वच्छता अभियानालाही बसला आहे.
शहरातील कचरा संकलनावर दरवर्षी ५० कोटी रुपये खर्च केले जातात. महापालिकेने शहरातील काही प्रभागात ओला आणि सुका कचरा वेगळे करण्यासाठी घरोघरी दोन स्वतंत्र डस्टबीन दिले. तसेच शहरातील काही प्रमुख मार्गावर ओला आणि सुका कचºयाचे दोन स्वतंत्र डस्टबीन बसविण्यात आले. परंतु ओला आणि सुका कचºयावरील स्वतंत्र प्रक्रियेबाबत मात्र महापालिका प्रशासनाने अद्याप व्यवस्था केलेली नाही.
स्वच्छतेत शहराचा क्रमांक अव्वल यावा यासाठी महापालिका प्रशासनाने साडेसहा हजार नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळे करण्यासाठी दोन डस्टबीन दिले. मात्र, आर्थिक स्थिती आणि लोकांची डस्टबीन विकत घेण्याची मानसिकता नसल्यामुळे ही योजना बारगळली. त्यानंतर शहरातील विविध भागातील पदपथांवर किंवा इतरही वर्दळीच्या ठिकाणी ओला, सुका कचºयाच्या संकलनासाठी १२०० डस्टबीन बसविले. यासाठी वैद्य अ‍ॅन्ड कंपनीला ५ कोटी रुपये देण्यात आले. त्यामुळे घरोघरी जमा होणारा ओला आणि सुका कचरा या डब्यांमध्ये टाकला जाईल, अशी अपेक्षा होती मात्र, शहरातील अनेक भागात हे डस्टबीन कचºयाने भरलेले दिसतात. काही ठिकाणचे डस्टबीन चक्क गायब झाले आहेत. शहरात दररोज सुमारे ११०० मेट्रिक टन जमा होतो. भांडेवाडीत ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो, परंतु हा ओला, सुका कचरा साठवण्यासाठी भांडेवाडीमध्ये स्वतंत्र व्यवस्था नाही. जेमतेम १५० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केली जाते.

आरोग्य विभागातील (स्वच्छता) महत्वाची मंजूर व रिक्त पदे

पद                                                                  मंजूर                           रिक्त
आरोग्य उपसंचालक                                             १                                    १
आरोग्य अधिकारी                                                 १                                   १
अतिरिक्त आरोग्य अधिकारी                                 १                                    १
सहायक आरोग्य अधिकारी                                    १                                   १
अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी                    १                                   १
स्टेनोग्राफर                                                            १                                   १
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक                                          ३६                                 ३०
कनिष्ठ स्वच्छता निरीक्षक                                       १९                                 १८
स्वच्छता अधीक्षक                                                  ७                                    ५

 

 

Web Title: Lack of human power: How will the sub-capital first in clean?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.