विदर्भातील डेंग्यू प्रभावित जिल्ह्यात प्रयोगशाळा सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 08:30 PM2017-12-18T20:30:58+5:302017-12-18T20:32:09+5:30

राज्यात डेंग्यू निदानासाठी ३८ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी विदर्भात १० प्रयोगशाळा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली येथे आहेत. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येतील तेथे विशेष बाब म्हणून डेंग्यू निदान प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील.

Laboratoraries in Dengue-affected district of Vidarbha will be started | विदर्भातील डेंग्यू प्रभावित जिल्ह्यात प्रयोगशाळा सुरू करणार

विदर्भातील डेंग्यू प्रभावित जिल्ह्यात प्रयोगशाळा सुरू करणार

Next
ठळक मुद्देविधानसभेत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची माहिती

ऑनलाईन लोकमत
नागपूर : राज्यात डेंग्यू निदानासाठी ३८ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी विदर्भात १० प्रयोगशाळा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली येथे आहेत. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येतील तेथे विशेष बाब म्हणून डेंग्यू निदान प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील. राज्यात नोव्हेंबर अखेर ३८,५७४ व्यक्तींना स्वाईन प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत दिली.
आमदार विजय वडेट्टीवार यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना आरोग्य मंत्री डॉ. सावंत बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात नोव्हेंबरअखेर डेंग्यूचे ६८९४ रुग्ण आढळून आले आहेत. विदर्भात आॅगस्ट ते आॅक्टोबर या काळात २३४ रुग्ण आढळले, मात्र डेंग्यूमुळे रुग्ण दगावल्याची नोंद नाही. विदर्भ हा कीटकजन्य आजारासाठी अतिसंवेदशील असल्याने या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना गांभीर्याने राबविल्या जात आहेत.
यावेळी झालेल्या चर्चेत एका उपप्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्री म्हणाले की, स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी आॅसेल्टॅमीवीर हे औषध नागपूर येथील मेडिकल कॉलेज व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून सर्व औषधी दुकानातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
डेंग्यू, मलेरिया सारख्या कीटकजन्य आजारावर नियंत्रणासाठी कीटकजन्य सर्वेक्षण केले जात आहेत. स्वाईन फ्लू निदानासाठी विदर्भात दोन शासकीय व एक खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्हे मलेरियासाठी संवेदनशील आहेत. त्यामुळे विदर्भातील ११ जिल्ह्यापैंकी नऊ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करण्यात येते.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री डॉ. मिलिंद माने, अशोक पाटील, अमीन पटेल, यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला.

 

Web Title: Laboratoraries in Dengue-affected district of Vidarbha will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.