भिसीचा हप्ता न भरल्यामुळे नागपुरात अपहरण : चार आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:53 AM2019-05-15T00:53:23+5:302019-05-15T00:53:56+5:30

भिसीचा मासिक हप्ता न भरल्यामुळे एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना पाचपावली येथील अशोक चौकात घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून व्यापारी बंधूंसह चार आरोपींना अटक केली आहे.

Kidnapping for bhisi : Four accused arrested in Nagpur | भिसीचा हप्ता न भरल्यामुळे नागपुरात अपहरण : चार आरोपीस अटक

भिसीचा हप्ता न भरल्यामुळे नागपुरात अपहरण : चार आरोपीस अटक

Next
ठळक मुद्देपाचपावली भागातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भिसीचा मासिक हप्ता न भरल्यामुळे एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना पाचपावली येथील अशोक चौकात घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून व्यापारी बंधूंसह चार आरोपींना अटक केली आहे. प्रवीण दरयानी (३९), त्याचा भाऊ रवी दरयानी (३२), निर्मलसिंग ऊर्फ बब्बू वीर सतनामसिंग अटवाल आणि नवज्योत सिंह लाडी अजितसिंग धुम्मन (३५) रा. जरीपटका अशी आरोपीची नावे आहेत.
दरयानी बंधूचा फरसाण आणि बिस्कीटाचा व्यवसाय आहे. पोलीस सूत्रानुसार दरयानी बंधू भिसीसुद्धा चालवतात. अशोक चौक येथील रहिवासी ईश्वर कुंगवानी हे सुद्धा त्यांच्या भिसीशी तीन वर्षांपूर्वी जुळले होते. कुंगवानी यांचा नंबर लागला. त्यांनी भिसीचे १.२० लाख रुपये घेतले. त्यांना दर महिन्याला १० हजार रुपयाचा भिसीचा हप्ता भरायचा होता. कुंगवानी यांनी नऊ महिने नियमित हप्ते भरले. तीन हप्ते म्हणजेच ३० हजार रुपये ते भरू शकले नाही. यामुळे दरयानी बंधू नाराज होते. ते कुंगवानी यांना भिसीचे पैसे देण्याबाबत दबाव टाकत होेते. यामुळे त्यांच्यात वादही सुरु होता.
१३ मे रोजी २.३० वाजता दरयानी बंधू हे बब्बू वीर आणि नवजोत सिंह यांच्यासह कुंगवानी यांच्या घरी गेले. तिथे त्यांना बळजबरीने बाईकवर बसवून पाटणकर चौकात आणले. तिथे एका टिनाच्या शेडमध्ये त्यांना बंधक बनवून पैशाची मागणी केली. पैसे न दिल्याने मारहाण केली. आरोपी कुंगवानीसोबत त्यांची मोटार सायकल सुद्धा घेऊन आले होते. कुंगवानी यांना बंधक बनवल्यानंतर आरोपी त्यांची बाईक घेऊन फरार झाले.
कुंगवानी यांनी कशीबशी स्वत:ची सुटका केली. सुरक्षा भिंत ओलांडून ते पळाले. ते खूप घाबरले होते. म्हणून पोलिसांकडेही गेले नाहीत. सोमवारी सकाळी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अपहरण, मारहाण आणि खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.
लोकमतचे वृत्त खरे ठरले
लोकमतने बॉबी माकन हत्याकांडादरम्यान उत्तर नागपुरात सर्रासपणे भिसीचा धंदा चालत असल्याचे वृत्त दिले होते. या धंद्यातील मोठा मासा असलेला मंजित वाडे हा सुद्धा बॉबीच्या हत्याकांडात सहभागी आहे. परंतु तो अजूनही फरार आहे. हत्येचा सूत्रधार लिटील सरदारसह उत्तर नागपुरातील अनेक गुन्हेगार भिसीच्या धंद्यात मालामाल झाले आहेत.

 

Web Title: Kidnapping for bhisi : Four accused arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.