खासदार महोत्सव : ‘शिर्डी के साईबाबा’ने घडविले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:32 PM2018-12-12T23:32:39+5:302018-12-12T23:36:44+5:30

साईबाबांच्या मार्गदर्शनाने शिर्डीत राम जन्मोत्सव आणि जन्माष्टमीचा सोहळा रंगलाय. हिंदू श्रद्धाळू हिरव्या पताका घेऊन आणि मुस्लिम बांधव भगवे झेंडे घेऊन या उत्सवात हर्षोल्हासाने सहभागी झाले आहेत. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत दर्शन घडविणारे हे दृश्य ‘शिर्डी के साईबाबा’ या महानाट्यात दिसून आले. साईबाबा हे विशिष्ट जातीधर्मापुरते मर्यादित नव्हते. स्वत:ला अल्लाहचा बंदा आणि ईश्वराचा सेवक संबोधणाऱ्या साईबाबाने सर्व धर्मीयांना सारखाच आशीर्वाद दिला. म्हणून शिर्डीमध्ये आजही सर्व धर्मीयांची मांदियाळी लागली असते. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर रंगलेल्या या महानाट्याने धार्मिक ऐक्याचा संदेश प्रेक्षकांना दिला.

Khasdar Festival: 'Shirdi ke Saibaba' created national integration | खासदार महोत्सव : ‘शिर्डी के साईबाबा’ने घडविले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

खासदार महोत्सव : ‘शिर्डी के साईबाबा’ने घडविले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देभक्तिमय वातावरणात महानाट्याचा नेत्रदीपक प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साईबाबांच्या मार्गदर्शनाने शिर्डीत राम जन्मोत्सव आणि जन्माष्टमीचा सोहळा रंगलाय. हिंदू श्रद्धाळू हिरव्या पताका घेऊन आणि मुस्लिम बांधव भगवे झेंडे घेऊन या उत्सवात हर्षोल्हासाने सहभागी झाले आहेत. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत दर्शन घडविणारे हे दृश्य ‘शिर्डी के साईबाबा’ या महानाट्यात दिसून आले. साईबाबा हे विशिष्ट जातीधर्मापुरते मर्यादित नव्हते. स्वत:ला अल्लाहचा बंदा आणि ईश्वराचा सेवक संबोधणाऱ्या साईबाबाने सर्व धर्मीयांना सारखाच आशीर्वाद दिला. म्हणून शिर्डीमध्ये आजही सर्व धर्मीयांची मांदियाळी लागली असते. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर रंगलेल्या या महानाट्याने धार्मिक ऐक्याचा संदेश प्रेक्षकांना दिला. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार महोत्सवात बुधवारी संस्कार मल्टी सर्व्हिस आणि आसावरी तिडके निर्मित या महानाट्याचे नेत्रदीपक सादरीकरण झाले. लेखक व दिग्दर्शक डॉ़ नरेश गडेकर हे आहेत. साईबाबा अगम्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या सान्निध्यात जे जे आले, त्यांनी त्यांच्यातील चमत्कार अनुभवले़ त्यांच्या जीवन चरित्रासह भक्तांनी अनुभवलेल्या या चमत्कारांचे चित्रण या महानाट्यातून करण्यात आले. विशाल रंगमंच, नृत्य, गीतसंगीत व भावपूर्ण संवादाने सजलेल्या या महानाट्यातून भव्यतेचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला. साईबाबांची प्रमुख भूमिका करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता अनिल पालकर यांनी मंच व्यापून टाकला. याशिवाय विनोद राऊत, मुकुंद वसूले, साहिल पटवर्धन, मीना देशपांडे, रोशन नंदवंशी, प्रशांत मंगदे, हेमंत मुढाणकर, राकेश खोडे, सुधीर पाटील, मोहन पात्रीकर, अनिल कळमकर, रमेश बेलगे, शक्ती रत्ना, नितीन पात्रीकर, आदित्य इटनकर, जयंत पाध्ये, श्याम आस्करकर, कीर्ती मानेगावकर, किरण देशपांडे, लता कनाटे, बळवंत येरपुडे, मुग्धा देशकर, नचिकेत म्हैसाळकर, सायली भुसारी, विनोद गार्जलवार, कविता भुरे, रूपेश सिंग, विजय नरुले, अशोक गवळी, ललित घवघवे, संतोष साने, राजाभाऊ वेणी, रवींद्र भुसारी, विशाल घटाटे, आरती शेबे यांच्यासह शेकडो कलावंतांनी विविध भूमिका साकारून महानाट्याची रंगत वाढविली. 

महानाट्याचे सहदिग्दर्शक म्हणून प्रकाश पात्रीकर तर सहायक दिग्दर्शक म्हणून अतुल शेबे यांनी जबाबदारी सांभाळली़ संगीत मोरेश्वर निस्ताने, पार्श्वसंगीत शैलेश दाणी यांचे होते़ बळवंत येरपुडे, श्याम धर्माधिकारी, डॉ़ मनोज साल्पेकर यांनी यातील गाणी लिहिली. स्पेशल इफेक्ट राकेश खाडे, नेपथ्यकार सुनील हमदापुरे व नाना मिसाळ, रंगभूषाकार बाबा खिरेकार व राजेश अंबुलकर, ध्वनी मुद्रक सारंग जोशी व मनीष नायडू, ध्वनी संयोजक संदीप बारस्कर, प्रकाशयोजना विशाल यादव यांची होती़ तर निर्मिती व्यवस्थापन निर्भय जोशी, मुस्ताक, मंगेश दिवटे, योगेश चांदेकर, प्रवीण देशकर यांनी सांभाळली़
तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार नागो गाणार, प्रा. अनिल सोले, जयप्रकाश गुप्ता आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महानाट्य प्रयोगाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार 

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ़ भालचंद्र अंधारे, शिवकथाकार विजयराव देशमुख, ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने, चित्रकार नाना मिसाळ, रमेश सातपुते, प्रकाश बेतावार, निवेदक किशोर गलांडे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश शिव यांचा सत्कार करण्यात आला़

 

Web Title: Khasdar Festival: 'Shirdi ke Saibaba' created national integration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.