न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 09:44 PM2018-01-16T21:44:21+5:302018-01-16T21:46:17+5:30

न्यायमूर्ती ब्रजगोपाल लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे करण्यात आलेल्या शवविच्छेदन व फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे, अशी माहिती नागपूरचे सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली.

Justice Loya's death was only due to heart attack | न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानेच

न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानेच

Next
ठळक मुद्देनागपूर पोलिसांची स्पष्टोक्ती : सखोल चौकशीनंतरच तपास बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : न्यायमूर्ती ब्रजगोपाल लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे करण्यात आलेल्या शवविच्छेदन व फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे, अशी माहिती नागपूरचे सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली. बोडखे म्हणाले की १ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी एका खासगी रुग्णालयात ब्रजगोपाल लोया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉ. प्रशांत राठी यांनी पोलिसांना दिली होती. डॉ. राठी यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी त्यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मेडिकलला पाठविले होते.
न्यायमूर्ती लोया हे नातेवाईकाच्या लग्नासाठी नागपुरात आले होते. ते रविभवन येथे थांबले होते. पहाटे त्यांच्या छातीत अचानक वेदना सुरू झाल्याने, त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. रुग्णालयात ईसीजी के ल्यानंतर त्यांना हार्टअटॅक आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लगेच त्यांना दुसºया खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर, पोलिसांना पंचनामा तयार करण्यासाठी, मृताची ओळख व पुष्टी करण्यासाठी तसेच शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव स्वीकारण्यापर्यंत डॉ. प्रशांत राठी यांनी मदत केली होती.
बोडखे म्हणाले की, रविभवन हे सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने, तिथे आकस्मिक मृत्यूची नोंद करून त्यांचे पार्थिव न्यायमूर्ती लोया यांच्या मूळ गावी लातूर येथे पाठविण्यात आले होते. पार्थिवासोबत दोन सहकारी व एका पोलीस कर्मचाºयाला पाठविले होते. सदर पोलिसांनी ईसीजी करणाºया चिकित्सकाचा रिपोर्ट व ज्या रुग्णालयात त्यांना मृत घोषित केले, त्या रुग्णालयात झालेल्या उपचारासंदर्भातील दस्तावेजाची तपासणी केली. या तपासणीत न्यायमूर्ती लोया हे हृदयरोगाने ग्रस्त असल्याचे दिसून आले. शवविच्छेदनाच्या अहवालातही ‘कोरोनरी इन्सफिसेंसी’ यामुळे लोया यांचा मृत्यू झाल्याचे नमूद आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर विसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला होता. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातही न्यायमूर्ती लोया यांच्या शरीरात कुठलेही विषारी पदार्थ आढळले नाही. शवविच्छेदनाचा अहवाल व फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टच्या आधारावर सदर पोलीस न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदयविकाराचे झाल्याच्या निष्कर्षावर पोहचले होते. परंतु न्यायमूर्ती लोया यांचे प्रकरण पोलिसांकडून बंद करण्यात आले, असा आरोप करण्यात येत होता. या आरोपाचे खंडन करताना बोडखे म्हणाले की, पोलीस या प्रकरणात सखोल चौकशी करून, अंतिम निष्कर्षावरही पोहचले होते.

Web Title: Justice Loya's death was only due to heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.