शासकीय सेवेतून दिला नागपुरातील सर्वसामान्यांना न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:30 AM2018-03-08T11:30:56+5:302018-03-08T11:31:03+5:30

प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करताना काही वर्षातच नगररचना व मूल्य निर्धारण विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल यांनी शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी आपली ओळख निर्माण केली आहे.

Justice given by the government service to all the citizens of Nagpur | शासकीय सेवेतून दिला नागपुरातील सर्वसामान्यांना न्याय

शासकीय सेवेतून दिला नागपुरातील सर्वसामान्यांना न्याय

googlenewsNext

गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करताना काही वर्षातच नगररचना व मूल्य निर्धारण विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल यांनी शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी आपली ओळख निर्माण केली आहे. आई जिल्हा परिषदेच्या शाळेवर मुख्याध्यापिका व केंद्रप्रमुख तर वडील सहकार विभागात सचिव असल्याने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांची त्यांना जाण आहे. नगररचना विभागाच्या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या ग्रामीण भागातील गरीब व गरजू माणसाची कामे तातडीने व्हावी. त्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, यासाठी त्या तत्पर असतात.
वकील होण्याची इच्छा होती. परंतु आर्किटेक्चर झाल्या. सात वर्ष खासगी नोकरी केल्यानंतर सरळसेवा भरतीने २०१३ मध्ये सहायक संचालक पदावर गोंदिया येथे नियुक्ती झाली. त्यानंतर नागपूर महापालिकेच्या नगररचना विभागात सहायक संचालक पदाची अडीच वर्षे जबाबदारी सांभाळली. नियमबाह्य काम न करण्याच्या स्वभावामुळे अनेकदा अडचणी आल्या. पण तडजोड केली नाही. नगररचना विभागाकडे शहराच्या विकासाचे नियोजन करण्याची महत्त्वाची जबाबदारी असल्याने शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा. यासाठी प्रयत्न केला. गेल्या काही महिन्यापूर्वी शासनाच्या सहायक संचालक नगररचना व मूल्यनिर्धारण कार्यालयाची जबाबदारी मिळाली. यात महानगर क्षेत्र वगळून उर्वरित नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहणासाठी मूल्य निर्धारण, शासन नियुक्त निवाडा अशी जबाबदारी या विभागाकडे आहे. शासकीय सेवेतूनही समाजसेवा करता येते. नगररचना विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा नियोजबद्ध विकास व्हावा. यासाठी नियोजन व सामाजिक दायित्व म्हणून सामान्य नागरिकांची कामे तत्परतेने क रून त्यांना न्याय देण्याचा संकल्प सुप्रिया थूल यांनी व्यक्त केला.

Web Title: Justice given by the government service to all the citizens of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.